नागेश भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर सिध्देश्वर आवताडेंची मोहिते- पाटलांवर - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

नागेश भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर सिध्देश्वर आवताडेंची मोहिते- पाटलांवर

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी ३ एप्रिल शेवटची मुदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असलेतरी भाजपासाठी डोकेदुखी ठरणारे अपक्ष उमेदवार नागेश भोसले यांचे मतपरिवर्तन करण्याची जबाबदारी आ. प्रशांत परिचारक व त्यांचे बंधू उमेश परिचारक यांच्यावर आहे. तर सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी मोहितेपाटील पिता-पूत्रावर जबाबदारी सोपवली आहे.त्यानुसार पडद्याआड रोज बैठकांचे सत्र सुरू आहे.          आजतागायत राजकारणात मोहिते कुटुंबाचा शब्द प्रमाण मानून काम करणारे बबनराव आवताडे यांच्या गटाने दिवसभर बसून असलेल्या विजयसिंह मोहिते व आमदार रणजितसिंह मोहिते यांना कोणताही शब्द दिलाच नाही. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मोहिते गटाने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.३० वर्षांपासून सहकार क्षेत्रावर बबनराव आवताडे यांचे वर्चस्व असून तालुक्यातील जवळपास सर्वच सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. गावस्तरावरील त्यांच्या समर्थकांची फळी आहे. याचा फायदा होण्यासह सिद्धेश्वर आवताडे यांनी शहरासह ग्रामीण भागात बैठका घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.

भाजपने दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. ते पक्षांतर्गत सहमतीचे उमेदवार असतानच त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सिद्धेश्वर अवताडे यांच्या उमेदवारीचा समाधान आवताडे यांना फटका बसण्याची भीती आहे. सिद्धेश्वर यांनी माघार घ्यावी, यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते बबनराव आवताडे यांची मोहिते गटाकडून मनधरणी केली जात आहे.                                                                     अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते यांनी निवडणुकीत माघार घेण्याची विनंती केली. मात्र, मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. आता माघार घेणार नाही. तालुक्यातील पाणीप्रश्न, राेजगार निर्मितीसाठी मी ही निवडणूक लढविणार आहे.

सिद्धेश्वर आवताडे यांच्या अर्ज माघारीवर भाजपच्या प्रचाराचे धोरण ठरणार आहे. जर, त्यांनी अर्ज ठेवला तर भाजपला हे प्रकरण जड जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर समाधान अवताडे कोणता मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.                                                        दरम्यान नागेश भोसले हे परिचारक यांचे खंदे समर्थक आहेत. परिचारक यांनी आतापर्यंत भोसले परिवाराला प्रत्येक सहकारी संस्थेत संधी दिली आहे.त्यांना समजवण्यात परिचारक यांना नक्कीच यश येईल.तर जाणकार च्या मते नागेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज राहिल्यास भाजपला मदत असे बोलले जात आहे. या गोष्टीचा विचार केल्यास नागेश भोसले यांचा अर्ज राहु शकतो.परंतु भाजपासाठी धक्कादायक ठरणारी उमेदवारी म्हणजे सिद्धेश्वर आवताडे यांची यासाठी मोहिते पाटील बरोबर भाजपा वरिष्ठ नेत्यांने लक्ष गरजेचे आहे हे ही मतदारामधून बोलले जात आहे.                                                         तर उमेदवारी राहिल्यास गणित बिघडवणार...

 या निवडणुकीत भाजपा व महाविकास आघाडी अशी सरळ लढत होईल असे संकेत होते. दोन्ही बाजूनी तसे प्रयत्न ही सुरू होते. मात्र शिवसेनेच्या शैला गोडसे व स्वाभिमानी चे सचिन शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवत आघाडीला धक्का दिला आहे. तर भाजपाकडून आ. परिचारकसमर्थक माजी नगराध्यक्ष नागेश भोसले व समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. हे चारहीजण कोणाचे विजयाचे गणित बिघडवणार याबाबत रोज वेगवेळ्या चर्चा घडत आहेत.


test banner