महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी;केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा! - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी;केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा!

 


मुंबई(विशेष प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सिंधुदुर्गातील आजी - माजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.त्यामुळे राज्यातील पत्रकारांना आजपासून टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. आमदार , खासदार , मंत्री , स्वातंत्र्यसैनिक यांच्याप्रमाणे पत्रकारदेखील समाजासाठी झटत असतात.

सर्वस्व देत असतात जीव धोक्यात घालत असतात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून, ओळखला जातो. या पत्रकाराला त्याची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर आपणास टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.                                या भेटीवेळी प्रभू यांनी सिंधुदुर्गातील पत्रकारांची मागणी कशी रास्त आहे, हे गडकरींना पटवून दिल्यानंतर केवळ सिंधुदुर्गातील पत्रकारांनाच नव्हे, तर राज्यातील सर्व पत्रकारांना टोलमाफी करीत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली व तसे आदेश काढण्याच्या सूचना सचिवांना दिल्या. त्याचप्रमाणे आपल्या या महामार्गावर जर कुणा पत्रकाराचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याला पाच लाखाचा विमा देण्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली. तसेच ही सवलत फक्त अधीस्विकृतीधारक पत्रकारांनाच नव्हे, तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

1 टिप्पणी:

  1. दिव्यांगाच्या कल्याणार्थ अपंग (दिव्यांग) व निराधार बहुउद्देशिय कल्याणकारी संस्था नागपूर द्वारा संचालीत स्नेहसदन मतिमंद मुला मुलीचीं विशेष अनिवासी शाळा शितलवाडी,रामटेक ता.रामटेक जि.नागपूर ही शाळा रामटेक येथे 15 अॉगष्ट 1999 पासुन चालविण्यात येत असुन शाळा आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा अनुज्ञाप्ती क्रंमाक 0805 नुसार नोदंणी प्राप्त असुन विनाअनुदानित तत्वावर गेल्या 21 वर्षापासुन सुरू आहे. शाळेत एकुण 40 मतिमंद मुलाना विशेष शिक्षण प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचे कार्य करीत असतानी शाळेला आर्थीक अडचणी येत आहे.शाळेतील विद्यार्थी अंत्यत गरीब व निराधार घरातील असुन सर्व सुविधा मोफत पुरविण्या येतात.व विविध प्रकल्पातुन आत्मनिर्भर करण्यात येते.
    शाळा विनाअनुदानित व अत्यंत सिव्हीअर वंचीत दिव्यांग प्रवर्गातील मतीमंद मुलान करिता महत्वाचा अविभाज्य अंग असल्यामुळे शाळेला खालील बाबींवर खर्चाकरिता लोकसहभागातुन आर्थीक सहाय्यतेची नितातं आवश्यक्ता आहे.
    1) मोफत स्कुल बस सेवा व मुलाचा प्रवास खर्च
    2) शैक्षणीक साहित्य TLM
    3) स्वच्छता साहित्य
    4) थेरॅपी कॅम्पींग व मटेरिअल, मासशास्त्रीय तपासणी
    5) स्टेशनरी
    6) मानधन व मदतनीस भत्ता
    7) युनीफार्म, बॅग दस्ता, ओळख पत्र,
    8) आधारबेस यंत्रना
    9) विविध प्रत्येक्षदर्शी मॉडेल
    10) शाळेत भौतिक,व क्रिडा सुविधेबाबत.
    11) औषधी खर्च
    12) मनोरंजन साहित्य व इतर उकरणे खरदी करिता एकदंरीत 4 लक्ष ऐवढा खर्च येतो. सध्याच्या कोरोना काळात पण शाळा मुलाना घरपोच दिशा प्रकल्पा द्वारे व प्रत्यक्ष विशेष शिक्षण दिल्या जात आहे.शाळेला बंद होण्यापासुन व सुरू राहण्याकरिता मतिमंद मुला मुलीच्या शाळेला आर्थीक यथाशक्ती शक्य ती साहित्य स्वरूपात पण सहाय्यता करावी.
    हि विनंती.
    धन्यवाद !
    आपला
    पंकज पांडे
    मुख्याध्यापक/शाळा प्रमुख
    स्नेहसदन मतिमंद मुला मुलीचीं विशेष अनिवासी शाळा शितलवाडी रामटेक जि.नागपूर 441106
    मो.9175116612

    उत्तर द्याहटवा