मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ, भारतीय खाद्य निगम व जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासुन हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शंभुमामा नागणे यांच्या हस्ते संपन्न झाले
यावेळी भारतीय खाद्य निगमचे प्रबंधक गुणनियंञण राहुल कुलकर्णी मंजुनाथ कस्तुरे लोकेश मिना केंद्र प्रमुख मच्छिंद्र आप्पा कौंडुभैरी बाजार समिती सचिव सचिन देशमुख विनायक आवताडे दत्ताञय टुले अनिल जाधव दामाजी वाकडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते
यावेळी व्यवस्थापक हणमंतराव मासाळ यांनी पुढे बोलताना माहिती दिली की कृषि उद्योग संघ चेअरमन व संचालक मंडळ यांनी शासन दरबारी वेळो-वेळी पाठपुरावा करुन शेतक-यांच्या सोयीसाठी सदरचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहे
या खरेदी केंद्रामुळे मंगळवेढा तालुक्यासह व इतर तालुक्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ कार्यालयाच्या विभागाकडून एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतक-यांनी हरभरा विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणायचा आहे त्यानंतर विक्री केलेल्या हरभरा या पिकाची रक्कम ऑनलाईन शेतक-यानी दिलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे चालुवर्षी हरभरा या धान्यासाठी आधारभूत किंमत ५१०० /- रुपये आहे
खरेदी केंद्रांच्या अधिक माहिती साठी कृषि उद्योग सहकारी संघाचे व्यवस्थापक हणमंतराव मासाळ ९६६५७४१९६० शंभुमामा नागणे मो नं ९४०५२१४५९५, मच्छिंद्र कोंडुभैरी ९८९०८३१९३४ (९०२८५०९७७७)यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले