केंद्रीय कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी मंगळवेढा वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

रविवार, ७ मार्च, २०२१

केंद्रीय कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी मंगळवेढा वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

 मंगळवेढा(प्रतिनिधी)अॕड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर विविध तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि  जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकऱ्यांना जात असलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे आणि दिल्लीतील आंदोलनकर्त्यांना  पाठिंबा देण्यासाठी मा.अँड प्रकाश तथा बाळासाहेब  आंबेडकर यांनी महाराष्ट्राला हाक दिली, त्याचाच भाग म्हणून  मंगळवेढा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

     तीन जाचक असलेल्या कृषी कायद्याविषयी तालुका पदाधिकारी यांनी मार्गदर्शन करून समजावून सांगितले, तसेच शेतकऱ्यांचे  या देशाचे जाणते नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच होते.त्यानंतर ही शेतकऱ्याच्या या देशात भूमिका मांडण्यासाठी आजही आंबेडकर घराणे आग्रही आहे,म्हणून शेतकरी, मजूर, दलित, वंचित,शोषित या सर्वांचे नेते मा.अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हेच आहे त्यावरून दिसून येते.

      सदर  आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष वैभव भंडारे, शहराध्यक्ष सोमनाथ ढावरे, प्रा. बिराप्पा मोठे,  महासचिव प्रा. महादेव ढोणे,प्रा.अँड दत्तात्रेय खडतरे, पंढरपूर-मंगळवेढा निरीक्षक अशोक माने,उपाध्यक्ष मल्हारी लोखंडे, महासचिव आनंता वाघमारे,सचिव बाळू वाघमारे,संघटक चांगदेव चव्हाण,प्रसिद्धीप्रमुख आशितोष कांबळे,लखन शिकतोडे,सतीश लोकरे, दत्तात्रय कांबळे,भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष विठ्ठल सरवदे, संजय सरवदे,रमेश जगधने,निसार शेख,बिराप्पा गडहिरे,शशिकांत रोकडे,रईस मुलाणी,गौरीहर झेंडे, दिलीप शिवशरण,अर्जुन शिवशरण,प्रा. रवींद्र आठवले इत्यादीनी उपस्थित राहुल सदर आंदोलनाचे निवेदन मा. तहसीलदार सो.मंगळवेढा यांना देण्यात येऊन आंदोलनकर्त्यांच्या  माध्यमातून भावना केंद्र शासनास कळवाव्यात, ही विनंती करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा