ही निवडणूक जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात-गोपीचंद पडळकर समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ३० मार्च, २०२१

ही निवडणूक जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात-गोपीचंद पडळकर समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून ३० मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रवादीने दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तर भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे. समाधान आवताडेंच्या पहिल्या प्रचार सभेदरम्यान भाजपचे ढाण्या वाघ आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.यासोबतच, पडळकरांनी त्यांच्या अपयशाचा किस्सा देखील नमूद केला. ‘माझी आमदार होण्याची प्रचंड ईच्छाशक्ती होती. पण सारखा-सारखा पडत होतो. तीन विधानसभेच्या निवडणूक झाल्या एक लोकसभेची निवडणूक झाली. ईच्छा असल्यामुळे चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीसांनी माझ्या ध्यानीमनी नसताना, बारामतीमध्ये डिपॉझिट जप्त होऊनही मला विधानपरिषदेच्या आमदारकीचा अर्ज भरायला बोलावलं. माझ्या मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती होती म्हणून मी आमदार झालो, तसंच समाधान आवताडे यांची देखील आमदार इच्छा होण्याची आहे. आता ती योग्य वेळ आली असून पांडुरंगा चरणी मी प्रार्थना करतो ते निवडणून यावेत. यासाठी सगळ्या जनतेने त्यांनाच मतदान करावं,’ असं भाष्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

‘ही निवडणूक भारतनाना भालके किंवा त्यांच्या कुटुंबाविरोधात नाही. ही निवडणूक शेतकरी, कष्टकरी जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात आहे. ज्यांनी 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट ठेवलं, अशा भ्रष्ट सरकारविरोधात आहे. भारत नानांना शांती मिळायची असेल, तर मविआ सरकारविरोधात मतदान करा’ असं आवाहन देखील गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

test banner