मंगळवेढा(प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिल रोजी मतदान तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यासाठी अनेक जणांनी तयारी केली आहे. प्रत्येक पक्ष निवडणूक आयोग कधी तारीख जाहीर करतो याकडे लक्ष लागले होते.आज ती तारीख जाहीर झाली असून 23 मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारभ होणार आहे. 30 मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख तर 3 एप्रिल पर्यत अर्ज मागे घेता येणार आहे. प्रत्यक्ष मतदान 17 एप्रिल तर मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यामुळे आचार संहिता लागू झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात वातावरण तापणार आहे