राज इलेक्ट्रॉनिक्स ने बजाज कार्ड धारकांसाठी - प्रत्येक खरेदीवर कोविड 19 लस मोफत देण्याची कौतुकास्पद ऑफर दिली आहे.
कोरोंनाच्या महामारीमुळे मागील वर्ष वाया गेले आणि या वर्षीही तशीच अवस्था निर्माण होवू पाहत आहे. पन आपल्या वैज्ञानिकानी मेहनतीने लस शोधून काढली आहे. जास्तीत जास्त लोकानी लस घेवून सुरक्षित राहावे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना लस घेण्याबद्दल आवाहन केले आहे. राज इलेक्ट्रॉनिक्स यांच्या सामाजिक ऑफर ने समाजात लस घेण्याबद्दल जागृती होणार आहे. तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिनी याबद्दल राज इलेक्ट्रॉनिक्स चे मालक श्री.दिलीप सावंत यांचे कौतुक केले आहे.
व्यवसायीकाने सामाजिक भान ठेवून अश्या योजना लोकापर्यंत पोहचवणे खरंच कौतुकास्पद आहे.