मंगळवेढ्यातील प्रतिभावंत लेखक, कवी इंद्रजीत घुलेंनी महाराष्ट्रभर फुलवले शब्दांचे शिवार - दिवाळी अंकाचे साहित्यप्रेमी वाचकांकडून भरभरून कौतुक. दर्जा हा नेहमी आवडतो आणि तोच टिकतो हे त्यांनी सिद्ध केले.
दिवाळी अंकाला साहित्य परंपरेत मिळालेले स्थान मागील काही काळात अति व्यावसायिक स्पर्धेने ग्रासलेले होते
पण इंद्रजीत सारख्या कवी मनाच्या माणसाने दिवाळी अंकाचे गत वैभव प्राप्त करण्याचा चंग बांधला आणि त्यातूनच " शब्द शिवार " निर्माण झाले. मराठी साहित्यातील कसदार जेष्ठ साहित्यिक आणि नव्या दमाचे साहित्यिक यांची सांगड घालत पुन्हा एकदा हे शिव धनुष्य उचलले. वाचनापासून दूर जात असलेली पिढी कसदार आणि दमदार साहित्याकडे परत आकर्षित केली.
गेल्या ४ ते ५ वर्षापासून त्यांचा अंक नवीन वाचक वर्गाला वाचण्यास प्रोत्साहित करत आहे. मंगळवेढ्यात राहून महाराष्ट्रभर त्यांनी जसा स्व:ताचा श्रोता वर्ग मिळवला होता तसाच शब्द शिवार या अंकाने सुद्धा स्वत:चा एक वाचक वर्ग निर्माण केला आहे.
अंकाची कलात्मक मांडणी, दर्जेदार लेखकाची निवड आणि वाचकांनी आवड याचा सुरेल संगम साधत त्यांचा या वर्षीचा अंक सर्वांना आवडत आहे. त्यांचा दिवाळी अंक फक्त महाराष्ट्रभर नव्हे तर जिथे जिथे मराठी माणूस वाचतोय तिथे तिथे पोहचवा आणि मराठी साहित्याला आणि वाचकाला समृद्ध करावे अशीच एक वाचक म्हणून इच्छा असेल
शब्द शिवार चा अंक मिळवण्यासाठी 9423060112 या नंबरवर संपर्क करू शकता