सोलापुरात आणखी एकास कोरोनाची लागण, 66 जणांचे अहवाल निगेटिव्ह - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

सोलापुरात आणखी एकास कोरोनाची लागण, 66 जणांचे अहवाल निगेटिव्ह


         
                                                          मंगळवेढा(प्रतिनिधी )सोलापुरातील पाच्छा पेठ येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला होता. जिल्हा प्रशासनास माहिती मिळताच त्या भागात सर्वेक्षण करण्यात आले. या कोरोना बाधिताच्या संपर्कात एकूण 91 व्यक्ती आले होते. यापैकी 67 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 66 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज मंगळवारी दिली. उर्वरित चाचणीचा अहवाल सायंकाळीपर्यंत येणार असल्याचेही शंभरकर यांनी सांगितले.
सोलापुरातील पाच्छा पेठेतील एका व्यक्तीचा कोरोनामूळे मृत्यू झाला. हि माहिती मिळताच प्रशासनाने पाच्छा पेठसह एक किलोमीटर पर्यंत परिसर सील केला आहे. महापालिकेतील 60 कर्मचार्‍यानी सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते. त्या परिसरात 7 हजार घरे असून 43 हजार लोकसंख्या आहे. त्यापैकी 29 हजार लोकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्या मृत व्यक्तीच्या संर्पकात 91 व्यक्ती आले होते. 30 व्यक्ती इनिस्टटय़ूनल क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यापैकी 67 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. त्या व्यक्तीच्या संर्पकात आलेल्या व्यक्तीची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात होम क्वारंटाईन- 1 हजार 33 व्यक्ती
554 व्यक्तीचा- 14 दिवसाचा कालावधी संपला
होम क्वारंटाईन-579 व्यक्ती
आयसोलेशन वार्ड- 362 जण
निगेटिव्ह रिपोर्ट- 259
प्रलंबित रिपोर्ट- 102
इन्स्टिटय़ूशनल-539-214 जणांचा कालावधी संपला
इनिस्टटय़ूशनल क्वारंटाईनमध्ये-325
सोलापूर जिल्ह्यात- कोरोना बाधीत संख्या-2 , मृत्यू-1
लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीसह त्या पाfरसरात महापालिकेचे आरोग्य कर्मचारी सर्वेक्षण करीत येत आहेत. त्यामुळे सर्वेक्षण कामासाठी नागाfरकांनी मदत करावी. कोरोना संसर्ग थांबण्यासाठी नारिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं. तपासणी करण्यास येणार्‍या कर्मचार्‍यांना माहिती द्यावी. –मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

test banner