तपासणीशिवाय ब्रह्मपुरी गावात प्रवेश बंदी कोरोनो विरुद्ध लढ्यात सरपंच मनोज पुजारी मैदानात जनजागृतीसाठी सरपंच प्रत्येकाच्या दारी - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २४ मार्च, २०२०

तपासणीशिवाय ब्रह्मपुरी गावात प्रवेश बंदी कोरोनो विरुद्ध लढ्यात सरपंच मनोज पुजारी मैदानात जनजागृतीसाठी सरपंच प्रत्येकाच्या दारी


मंगळवेढा(प्रतिनिधी )कोरोनो या विषाणूजन्य आजाराने जगभरात खळबळ उडवली आहे महाराष्ट्रातही पुणे , मुंबई यासह विविध जिल्ह्यात आजाराचा प्रसार होत असल्याने दिसून येत आहे  बाहेर गावाहून येणार्‍या मुळे हा आजार बळावत असण्याची शक्यता आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे बाहेर गावाहून प्रामुख्याने पुणे मुंबई, गोवा येथून येणाऱ्यांनी तपासणी शिवाय गावात प्रवेश बंदी करण्यात आली असल्याची माहिती सरपंच मनोज पुजारी यांनी दिली  प्रत्येकाच्या दारात जाऊन घराबाहेर पडू नका , मास्क  बांधा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या घाबरू नका असे आवाहन करीत जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे
कोरोनो  व्हायरस या आजारामुळे मुंबईत, पुणेसह विविध जिल्ह्यात  बाधित  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे  आजपर्यंत तीन  रुग्णाचा मृत्यू झाला सोलापूर जिल्ह्यात एक कोरोनो बाधित रुग्ण सध्या पर्यत नाही ही स्थिती कायम ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या सूचनांचे प्रत्येकाने  पालन करण्याची सक्त गरज असल्याचे सरपंच मनोज पुजारी यांनी सांगितले
या  आजाराचा झपाट्याने प्रसार होत असल्याने राज्यातील शाळा बंद करण्यात आले आहेत याशिवाय प्रतिबंधात्मक उपाय यासाठी नगरपालिका, नगर  नगरपंचायत, ग्रामपंचायतींना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत  सध्या सर्वत्र संचार बंदी जाहीर केली आहे   जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत  त्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे खुद्द सरपंच कोरोनो  विरुद्ध च्या लढ्यात  मैदानात उतरले  असून ते घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत  प्रत्येक नागरिकाला मास्क रूमाल बांधण्याच्या वेळोवेळी हात स्वछ करण्यासाठी सूचना  करीत आहेत हा विषाणूजन्य आजार भयावह असून आपण जर वेळीच खबरदारी न घेतल्यास  गावेच्या गावे उद्ध्वस्त होतील  तरी याबाबत चेष्टामस्करी टिंगल-टवाळी न करता याचे गांभीर्य ओळखून योग्य ती दक्षता घेऊन आपले व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या घाबरू नका व याबाबत अफवा पसरवू नका असेही  आवाहन सरपंच  मनोज पुजारी  यांनी केले आहे यावेळी ग्रामसेवक संजय शिंदे, पोलीस पाटील प्रशांत पाटील, आप्पासाहेब देशमुख  विकास पुजारी किशोर देशमुख आर एच पाटील नवनाथ देशमुख यांच्यासह आशा वर्कर्स, आरोग्य सेविका सरगुले उपस्थित होते.

कोट-- जगभर धुमाकूळ घातलेल्या  कोरोनो या विषाणूजन्य आजाराची लागण महाराष्ट्रात ही  होत आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गावात प्रत्येक घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे पुणे-मुंबई यासह विविध भागातून गावात येणाऱ्यांनी तपासणीशिवाय गावात येऊ नये असे आवाहन केले आहे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामपंचायतीकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे
---- सरपंच मनोज पुजारी,  ब्रह्मपुरी ता. मंगळवेढा

चौकट-- बाहेरून बाहेरगावाहून आलेल्या ची माहिती द्या--- वेगाने पसरवनाऱ्या  विषाणुजन्य आजाराचा प्रतिबंध घालण्यासाठी बाहेरगावाहून म्हणजेच पुणे मुंबई, गोवा, नागपूर आणि विविध राज्यातून येणाऱ्यांची तात्काळ माहिती ग्रामपंचायतीला दिली जावी तसेच बाहेर गावाहून गावात येणाऱ्या नागरिकांना तपासणीशिवाय गावात प्रवेश दिला जाणार नाही असे सरपंच मनोज पुजारी यांनी घरोघरी जाऊन सूचित केले आहे

फोटो ओळी-- ब्रह्मपुरी येथे अत्यावश्यक सेवेत सुरु असलेल्या किराणा दुकानदाराला कोरोनो आजाराबाबत  खबरदारी घेण्यासाठी सूचना करताना सरपंच मनोज पुजारी 
test banner