शिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

शिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात


मंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी व्यक्त केले.
मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या आचार्य दादासाहेब दोंदे जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते विद्या प्रतिष्ठानचे प्रा.राजकुमार कदम,नगराध्यक्षा अरूणा माळी,नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, भगीरथ भालके,प्रशासनाधिकारी शाहू सतपाल,लतीफ तांबोळी, मच्छिंद्रनाथ मोरे,बब्रुवाहन काशिद,चंदाराणी आतकर,अरूण डोरले,संजय चेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षकांना बी.एल.ओ. सारखी अशैक्षणिक कामे लावण्यात येऊ नयेत त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे.यासारख्या शिक्षकांच्या अन्य प्रश्नांच्या संदर्भात फेब्रुवारी महिन्यात शिक्षक संघाचे राज्य अधिवेशन अलिबाग येथे आयोजित केले असून त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रमुख व्याख्याते बारामती विद्या प्रतिष्ठानचे प्रा.राजकुमार कदम यांनी आपल्या व्याख्यानामध्ये   ज्या शिक्षकांकडून प्रामाणिकपणे आदर्श विद्यार्थी घडवले जातात त्यांची मुलेही समाजात आदर्श घडत असतात मात्र जे स्वतःच्या कामाशी प्रामाणिक नसतात शाळेत ज्ञानदानाचे काम प्रामाणिक करत नाही त्यांच्या घरातीलही वातावरण बिघडते हा निसर्ग नियम आहे 'पेराल तेच उगवेल'म्हणून प्रामाणिकपणे काम करून आदर्श विद्यार्थी घडवत राष्ट्राच्या जडणघडणीत सामील व्हा असे आवाहन त्यांनी केले.
सदर प्रसंगी नगराध्यक्षा अरूणा माळी,जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप,भगीरथ भालके,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष लतीफ तांबोळी, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,जिल्हाध्यक्ष म.ज. मोरे,आदर्श शिक्षक भुजंगराव खटकाळे आदि मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. 
  आचार्य दादासाहेब दोंदे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हास्तरीय आचार्य दादासाहेब दोंदे आदर्श शिक्षक,आदर्श शाळा,आदर्श पत्रकारिता,आदर्श गटशिक्षणाधिकारी,आदर्श विस्ताराधिकारी,आदर्श केंद्रप्रमुख,आचार्य दोंदे जीवनगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय चेळेकर यांनी तर सूत्रसंचालन भारत शिंदे, भागवत तानगावडे, श्रीनिवास माळी व मोहन लेंडवे यांनी केले.आभार संभाजी तानगावडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-----------------------
चौकट

जीवनगौरव पुरस्कार:शिवाजी पाटील (ब्रम्हपुरी),
आदर्श पत्रकारिता:दत्तात्रय नवत्रे (दै.पुण्यनगरी),
आदर्श गटशिक्षणाधिकारी:धनंजय देशमुख(माळशिरस),
आदर्श विस्ताराधिकारी:विकास यादव (मोहोळ),
आदर्श केंद्रप्रमुख:खातुनबी आतार(माढा)
आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक (शाळा):-भुजंगराव खटकाळे(धर्मगांव), राजशेखर कोष्टी(बेदरेवस्ती),सायाप्पा कुंभार(मातुर्लिंगवस्ती),विद्या पाटील(मरवडे,मुले),चंद्रकांत डांगे (हुलजंती),शिवाजी भुसनर(बंडगरवस्ती),छाया कांबळे(मोरेवाडी),युवराज सावंत(घाडगेवाडी),सुर्यकांत पाटील(नंदेश्वर),अरुणा अंकोलीकर(खोलवाडी), प्रविण शिवशरण(बावची), पांडुरंग मासाळ(चौगुलेवस्ती),दिगंबर बनसोडे(लक्ष्मी दहिवडी),गोपाळ लेंडवे (पौट),भारती नागणे (न.पा. मंगळवेढा),कैलास हेगडे(इंग्लिश स्कूल,मंगळवेढा),आण्णा सुरवसे(मोहोळ),अनिता घुले(बार्शी),गजानन मिराशे (अक्कलकोट),नितीन पाटील(पंढरपूर),सोपान मोहिते(माढा),वैशाली शिवगुंडे(उ.सोलापूर),शितल शिंदे(माळशिरस),शोभा निकम(करमाळा),रतन कोळेकर(सांगोला),प्रमोद कस्तुरे(द.सोलापूर),
आदर्श शाळा:शिरसी,भालेवाडी,घरनिकी,शिवणगी
(मंगळवेढा),खांडेकरवाडी(सांगोला),शिरापूर(मोहोळ),शेंद्री(बार्शी),तिल्हेहाळ(द.सोलापूर),चिक्केहळ्ळी(अक्कलकोट),खरसोळी(पंढरपूर),उजनी(माढा),सोरेगाव(उ.सोलापूर),पानीव(माळशिरस),अंजनडोह(करमाळा
test banner