शिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

शिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर


प्रतीनिधी :
शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते या सप्ताहात आमंत्रित केले जातात. याचा लाभ पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ, युवक आणि महिला वर्ग घेत असतात. या संपूर्ण सप्ताहात येणार्‍या सर्वांची भोजनाची व्यवस्था ही केलेली असते.
          कुलवाडी भूषण ,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव निमित्त सालाबाद प्रमाणे श्री शिवछत्रपती युवक मंडळ,पेहे यांच्या वतीने शिवसप्ताह व्याख्यानमाला १३ फेब्रुवारी २०२० ते १९ फेब्रुवारी २०२०  दरम्यान आयोजित केली आहे. पुरोगामी चळवळीतील नामवंत व्याख्याते संवाद साधणार आहेत.

कार्यक्रम पत्रिका 


कार्यक्रम वेळ : रोज  सायंकाळी ७.३० वाजता 
कार्यक्रम स्थळ : प्राथमिक, माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ट महाविद्यालय पेहे ता.पंढरपूर 

पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी व्याख्यानाचा आणि भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती संयोजन मंडळाने केली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा