मराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

मराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसादमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेचे अनावरण नुकतेच करण्यात आले.
मराठा समाजातील उपवर मुलामुलींना अनुरूप जोडीदार मिळवा यासाठी मराठा वधू वर कक्ष काम करत आहे. मराठा समाज कालानुरूप बदलत आहे त्यामुळे  उत्तम प्रतिसाद मिळत आहे. उपवर मुलामुलींची माहिती पुस्तक स्वरुपात  मिळणार आहे.

मंगळवेढ्यात परिचय मेळावा आयोजित केल्यामुळे समाजातील बर्‍याच माता पित्यांची काळजी कमी होणार असल्याची चर्चा सध्या मराठा समाजात आहे.

शिक्षणामुळे सध्या मुलामुलींच्या  जोडीदारबद्द्लच्या अपेक्षा उंचवल्या असल्यामुळे अनुरूप जोडीदार शोधणे तसे जिकरीचे होत आहे. शहरात बर्‍याच खाजगी संस्था भली मोठी देणगी आकारून विवाह स्थळे सुचवण्याचे काम करत आहेत पण ग्रामीण भागात तशी सोय उपलब्ध नाही. त्यामुळे पालकांना मुलांच्या लग्नाची चिंता सतावत असते.

पण सेवा संघाच्या सहाय्याने पहिल्यांदाच असा परिचय मेळावा घडत असल्यामुळे पालकांनी त्याचे कौतुक केले आहे.

वधू वर कक्षाच्या वतीने होणार्‍या परिचय मेळाव्यासाठी जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभाग नोंदवून लाभ घ्यावा अशी विनंती सचिव शिवश्री. गणेश यादव सर , यांनी केली आहे.

थेट नोंदणी साठी क्रांति स्पोर्ट अँड बॅग हाऊस , कुंभारे हॉस्पिटल जवळ मंगळवेढा  
शिवश्री. दिलीप जाधव   मोबाइल  9096335774test banner