मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्यातील वाढती बेरोजगारी,रखडलेला पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, याची जाण व तळमळ समाधान आवताडे यांना आहे. ज्यांनी सत्ता भोगल्या त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला बगल देत दिशाभूल करण्याचे राजकारण केले आहे त्यामुळे आवताडे यांना पाठिंबा वाढत असून या मतदारसंघात ते इतिहास घडविणार असून या मतदारसंघाचा विकास तेच करू शकतात याची खात्री पटल्याने आम्ही पाठिंबा देत आहेत असे मंगळवेढा तालुका जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दामाजी माळी यांनी सांगितले . जनहित शेतकरी संघटनेने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना उद्योजक संजय आवताडे यांच्या उपस्थितीत पाठिंबा दर्शवला त्यावेळी ते बोलत होते .
यावेळी मंगळवेढा जनहित संघटनेचे तालुकाध्यक्ष दामाजी माळी, मतदार संघाचे अध्यक्ष बलभीम माळी, शहर अध्यक्ष पप्पू दत्तू, जनहित संघटनेच्या अल्पसंख्यांकांचे तालुकाध्यक्ष बाळू तांबोळी शहर उपाध्यक्ष मधुकर कोण भरी सल्लागार मोहन शिंदे, तालुका संपर्कप्रमुख युवराज कोण डोंगरी, तालुका उपाध्यक्ष बिरुदेव ढेकळे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रियाज मुजवर रघुनाथ चव्हाण यांनी अवताडे यांना पाठिंबा दिला आहे.