पंढरपूर मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध  : समाधान आवताडे   - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

पंढरपूर मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध  : समाधान आवताडे  



पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर ला दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते पण या तीर्थक्षेत्राचा विकास म्हणावा तसा झाला नाही अजून या मतदारसंघाला रस्ते,पाणी, वीज, या समस्यांसाठी झगडावे लागत आहे, तिसंगी तलावात पाणी सोडण्यासाठी दरवेळी शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागतात तालुक्यात एमआयडीसीचा प्रश्न सुटला नाही त्यामुळे तरुणाईमध्ये बेरोजगारी वाढून तरुण वर्ग व्यसनाधिनतेकडे वळत आहेत .वारंवार भूलथापांच्या आश्वासनांना बळी पडून चुकीचा माणूस निवडला तर पाच वर्ष पश्चाताप करावा लागतो त्यामुळे मतदारांनी विचार करून मला एक वेळ संधी द्या मी या मतदारसंघात नंदनवन करीन अशी ग्वाही समाधान आवताडे यांनी दिली.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामध्ये आपण काय विकास केला हे जनतेला सांगण्यासाठी प्रतिस्पर्ध्याजवळ मुद्देच नाहीत त्यामुळे एकमेकांवर टीका करण्यातच ते धन्यता मानण्यात मग्न आहेत, गेल्यावर्षी शंभर टक्के धरण भरून पाण्याचे नियोजन झालं नाही, तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न असतानाही पंढरपूर तालुक्यात चारा छावणी सुरू करता आली नाही, त्यामुळे नाकर्त्या लोकप्रतिनिधींना घरी बसवून मला एक वेळ संधी द्या मी माझा संसार उभा केला आहे मला आता या मतदारसंघाचा संसार उभा करायचा आहे जे पंचवीस वर्षात या लोकप्रतिनिधींना जमले नाही ते मी पाच वर्षात करून दाखवेन असा विश्वास पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे अपेक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी मतदारांना दिला आहे ते पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील प्रचार सभेत बोलत होते
 या प्रचारसभेत  बोलताना विठ्ठल चे माजी संचालक शेखर भोसले म्हणाले की समाधान आवताडे हे नेतृत्व कष्टातून पुढे आलेले नेतृत्व आहे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन ते एक यशस्वी उद्योजक आहेत त्यांना या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्यांनी स्वतःच्या उद्योगातून हजारो कुटुंबाना काम देऊन त्यांनी अनेकांचे प्रपंच उभे केले आहेत पण त्यांनी कधी दिखावा केला नाही मतदारसंघातील शेतकऱ्यांचा राजवाडा संबोधल्या जाणाऱ्या विठ्ठल सहकारी कारखान्यावर सहाशे कोटी कर्ज करून ज्यांनी वाट लावली अशा लोकांच्या हाती सत्ता देण्यापेक्षा निपक्ष निस्वार्थी,विकासाचे नेतृत्व म्हणून एक वेळ समाधान आवताडे यांना संधी द्या असे आवाहन भोसले यांनी केले.
यावेळी मंगळवेढा शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख येताळा भगत,दत्तात्रय जमदाडे,मोहनआप्पा बागल, गणेश बागल, सुधाकर फाटे, महादेव फटे,अंकुश गव्हाणे ,मधुकर बागल, संजय हुंडेकरी, सचिन हुंडेकरी ,औदुंबर शिंदे ,शांतिनाथ बागल, रवींद्र पाटील, समाधान बागल, नवनाथ बागल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उंबरगावचे परिचारक गटाचे माजी सरपंच दिगंबर पवार,लक्ष्मण पवार,औदुंबर पवार,यांनी आवताडे गटात प्रवेश केला.

test banner