मतदार आणि शिवसैनिकांच्या आग्रह खातर उमेदवारी अर्ज दाखल - शैला गोडसे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

मतदार आणि शिवसैनिकांच्या आग्रह खातर उमेदवारी अर्ज दाखल - शैला गोडसे


मंगळवेढा(प्रतिनिधी )शिवसेनेच्या हक्काची असलेली पंढरपूरची जागा रयत क्रांती दिल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना तीव्र झाल्याने  शिवसेनेतून इच्छुक असलेल्या शैला गोडसे यांना अपक्ष अर्ज दाखल करण्याचा आग्रह केल्याने अखेर त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान पक्षाच्या नेत्या समोर उभे राहिले आहे
       शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश करण्यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून मंगळवेढा मध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यात त्यांनी पाण्यासह इतर,आंदोलने व महिलांच्या महिलांच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेत आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यामुळे त्या शिवसेनेतून उमेदवारीच्या दावेदार झाल्या अशा परिस्थितीत मंगळवेढे येथे झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये जलसंधारण मंत्री ना.तानाजी सावंत यांनी  हा मतदारसंघ सोडण्यास सोडणार नसल्याचे सूतोवाच केले होते त्यामुळे शिवसैनिकाच्या आशा आणखीनच पल्लवी झाला अशा परिसरात जलसंधारण मंत्री सावंत यांनी आपली ताकद ज्याप्रमाणे करमाळा व  शहर मध्य साठी आपली ताकद पणाला लावली त्याप्रमाणे पंढरपूरमध्ये आपली ताकद पणाला लावली नसल्याची खंत शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे. दोन वर्षापासून तयारी केलेल्या गोडसे यांना अपक्ष अर्ज दाखल करण्याचा आग्रह धरला. या मतदारसंघात मध्ये बंडखोरी झाल्याचे असून दुसरे भाजपमधील इच्छुक आवताडे हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
test banner