एक अर्ज दाखल, २० इच्छुकांनी घेतले ३७ उमेदवारी अर्ज - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

एक अर्ज दाखल, २० इच्छुकांनी घेतले ३७ उमेदवारी अर्ज

   
                                                                          पंढरपूर(प्रतिनिधी )विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केल्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्विकारण्यास सुरुवात केली आहे. २५२-पंढरपूर विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.                                                                  २५२-पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी २७ सप्टेंबर २०१९ रोजी पर्यंत २० इच्छुक उमेदवारांनी ३६ अर्ज नेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक ४ आॅक्टोबर असून, शासकीय सुट्टीचे दिवस वगळता सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.    
test banner