मंगळवेढा(प्रतिनिधी )पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रत्येक गांव माझे आहे, या मतदारसंघातील प्रत्येक कुठुंबाची आर्थिक स्थिती सुधारावी हे माझे स्वप्न आहे.या मतदारसंघाचे महाराष्ट्रात आदर्श असे मॉडेल मला बनवायचे आहे त्यासाठी या मतदारसंघातील जनतेने मला साथ द्यावी असे प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.ते फाटेवडी,तळसंगी,खोमनाळ,हिवरगाव,भाळवणी,निंबोणी,माळवाडी,पौट,सलगर,आसबेवाडी,शिवनगी,येळगी,सोड्डी,हुलजंती या गावच्या प्रचार दौऱ्यात बोलत होते .
पुढे बोलताना ते म्हणाले, पंचवीस वर्षापासून खुंटलेला विकास येत्या पाच वर्षात करुन दाखवितो. या मातीतल्या उद्योजकांना संधी मिळाल्यास ते निश्चीतच यशस्वी होवू शकतात. एवढी कुवत आणि धमक इथल्या युवकांमध्ये आहे. परंतु आजपर्यंत त्यांना योग्य दिशा ,न्याय मिळाली नाही. प्रत्येकानी आजपर्यंत फक्त मताचा जोगवा मागण्याचेच काम केले आहे. जे वय विश्रांतीचे आहे त्या वयात उमेदवारी घेवून म्हणे जनतेची कामे करणार आहेत. पाणी आणण्याची खरंच मनापासून इच्छा असती तर पाणी यापूर्वीच पाणी आले असते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच त्यामागील कारण आहे. इतर नेत्यांप्रमाणे मी कांही आश्वासने देणार नाही. कारण आश्वासन देण्यापेक्षा करुन दाख्विण्यावर माझा विश्वास आहे. राजकारणाची उलथापालथ करुन ट्रॅक्टरने मशागत करण्याची वेळ आली आहे. वाढप्या ओळखीचा असला तर शेवटीच्या पंगतीच्या शेवटीच्या ओळीमध्ये जरी बसला तरी जेवण मिळते हे सभापती प्रदिप खांडेकर यांनी दाखवून दिले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी जास्तीत जास्त निधी या तालुक्याला आणला आहे. तसेच जि.प.समाजकल्याण सभापाती शिला शिवशरण यांनीही जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचे कार्य केले आहे. आपल्या मायेची थाप यापूर्वीही अनेक वेळा आपण मला दिलेली आहे, यापुढेही देवून निवडून देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
याप्रसंगी सभापती प्रदिप खांडेकर,प्रा.येताळा भगत सर, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण,माजी उपसभापती शिवाजी पटाप, प्रा.समाधान क्षिरसागर ,हणमंत मासाळ, शिवाजी शेणवे, उत्तम केंगार,बसवंत पाटील, महादेव साखरे,गुरय्या स्वामी,ह.भ.प.धर्मराज ताड, अमर शिंदे, महेश खटकळे,नागेश मासाळ व इतर मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
या प्रचार सभा प्रसंगी दामाजी कारखान्याचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी, जि.प.सदस्य दिलीप चव्हाण, संचालक बसवेश्वर पाटील, रामकृष्ण चव्हाण,पप्पू काकेकर,विजय माने, नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी, मार्केट कमेटी संचालक विष्णू फटे, आझाद दारुवाले,तसेच अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.