“ ईडी कार्यालयातील सक्षम अधिकाऱ्याने काल सायंकाळी
ई-मेलद्वारे मला दिनांक २७ सप्टेंबर रोजी व्यक्तिशः हजर राहण्याची आवश्यकता नसून, आवश्यकता भासल्यास मला रीतसर
सूचनेद्वारे बोलविण्यात येईल असे कळविले आहे. तसेच मुंबई पोलीस
आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझी प्रत्यक्ष भेट घेऊन माझ्या ईडी कार्यालय
भेटीमुळे महाराष्ट्रात व मुंबई शहरात तणावाची परिस्थिती असल्याचे विदीत केले व ईडी
कार्यालयाची भेट टाळावी, अशी विनंती केली. ”
सदर विनंतीस
अनुसरून तसेच मुंबई शहर व राज्यातील तणावाच्या परिस्थितीची सर्वसामान्य नागरिकांना
झळ पोहोचू नये म्हणून मी आज मुंबई येथील ईडी कार्यालयास भेट देण्याचा निर्णय
तूर्तास तहकूब करत आहे. असे त्यांनी
ट्विटर वरुन जाहीर केले
" माझ्या समर्थनात
रस्त्यावर उतरलेल्या सर्वाचे मी आभार मानतो आणि सध्या मी
पुणे शहर व जिल्ह्यातील बारामती, पुरंदर परिसरात मागील दोन दिवसांत
अतिवृष्टीने व महापुराने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने त्या भागातील
नुकसानाची पाहणी करण्यासाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी तातडीने जात आहे." अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटर द्वारे दिली