आमदार श्री. भारतनाना भालके गटाची विचार विनिमय बैठक - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

आमदार श्री. भारतनाना भालके गटाची विचार विनिमय बैठक


मंगळवेढा ( प्रतीनिधी )
आगामी निवडणुकीत राजकीय भूमिका ठरवण्यासाठी विचार विनिमय बैठक
बुधवार दिनांक ११ / ०९ / २०१९  रोजी सकाळी १०.४५ वा एमआयडीसी मैदान बायपास जवळ , मंगळवेढा पंढरपूर रोड येथे आयोजित केली आहे.

आमदार भारतनाना भालके कोणती भूमिका घेतात यावर बर्‍याच भावी आमदारांची राजकीय गणिते जुळणार किंवा बिघडणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्ता पेक्षा विरोधी उमेदवार जास्त अतुरतेने वाट बघत आहेत. असे चित्र सध्या मतदार संघात दिसत आहे.

राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे, देशाची स्थिति , मतदार संघाचे प्रश्न, भविष्यातील संधी सर्वाचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल.त्यामुळे जनतेच्या मनातील कल ओळखण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण ठरू शकते. या बैठकीनंतर पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघाच्या राजकीय हालचालींना वेग येणार हे नक्की .


test banner