मंगळवेढा (प्रतिनिधी)
छावा संघटना केंद्रीय अध्यक्ष मा.श्री.नानासाहेब जावळे-पाटील यांच्या आदेशावरुन व प.महा.अध्यक्ष मा.प्रतापसिंह कांचन-पाटील व जिल्हाध्यक्ष मा.नागेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर विभागीय जिल्हाध्यक्ष पदी मा.श्री.प्रज्वल शिंदे यांची निवड करण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रज्वल शिंदे म्हणाले तालुकाध्यक्ष पदावरून जिल्हाध्यक्ष पदावर पद्दोनत्ती झाली असताना हे मला मी आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचे संघटनेने व वरिष्ठांनी दिलेले फळ असून यापुढे ही असच संघटनेशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहून काम करत राहीन व हे करत असताना सर्व पदाधिकारी सदस्यांना सोबत घेऊन काम करीन तसेच संघटनेच्या पदाचा जो गैरवापर करेल त्याची गय केली जाणार नाही तसेच गोरगरीब सामान्य जनतेवर होणारे अन्याय सहन केले जाणार नाहीत कायम सामान्य नागरिकांच्या,शेतकऱ्यांच्या सोबत राहून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करीन असे प्रज्वल शिंदे म्हणाले. यावेळी जिल्हाकार्यध्यक्ष विशाल आडगळे,श्रीकांत वाघमारे,परमेश्वर राणे,श्रीकांत कांबळे आदि पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.