नानांना पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी द्या! -भगीरथ भालके - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

नानांना पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी द्या! -भगीरथ भालके

   
                                                                                                          मंगळवेढा(प्रतिनिधी )गेल्या दहा वर्षात नानांनी मतदारसंघात खूप कामे केली आहेत त्या कामांची माहिती लोकांना झाली पाहिजे त्यासाठी आगामी निवडणूकीत तरुणांनी नानांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून नानांना पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी दयावी असे भगीरथ भालके यांनी दि.२६ रोजी मारोळी येथील मठात कार्यकर्त्याशी संवाद साधताना आवाहन केले.
      आमदार भारत भालके हे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याचे गुढ कायम असताना भालके गट मात्र प्रचाराला लागले आहेत. त्या अनुषगांने मंगळवेढा तालुक्यातील भोसे गटातील तरूण वर्गाला व गटातील प्रमुख लोकांना एकत्र करून गटाच्या वतीने  मारोळी येथील बागडे बाबा भक्ताश्रम मठात भगीरथ भालके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
     विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर झाल्या तशा मंगळवेढयात राजकीय हालचालींना खूपच वेग आला आहे. यावेळची पंचवार्षिक निवडणूक मंगळवेढयात प्रतिष्ठेची होणार यात शंका नाही . अनेक दिग्गज राजकीय नेते निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांनी गाठीभेटी, गावदौरा , मेळावे आयोजित करू लागले आहेत. त्यात भालके गटाच्या वतीने मारोळी व लक्ष्मी दहिवडी येथे भगीरथ भालके यांनी दोन्ही जि.प. गटातील लोकांना ,तरुणांना एकत्र बोलावून आ.भारत भालके यांनी केलेली कामे मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचले पाहीजे त्या दृष्टीने तरूणांनी कामाला लागले पाहीजे असे आवाहन भालके गटांकडून करण्यात आले.
      वास्तविक गत निवडणूकीचा विचार केला तर मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावच्या पाण्याच्या प्रश्नाने निवडणुकीत वेगळीच रंगत आणली होती यंदाच्या ही निवडणुकीत ३५  गावच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा गाजणार यात काही शंका नाही या ३५ गावातील लोकांना पाणी मिळावे म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी प्रयत्न केल्याचे ठासून सांगत आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत खरंच पाण्याच्या प्रश्नावर कोणी कार्य केले हे लोकांना कळले पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भालके गटातील प्रत्येक व्यक्तीचे आहे असे प्रसंगी गटातील कार्यकर्ते बोलत होते.
      गाठीभेटीच्या दौऱ्यात बसवराज पाटील , तानाजी काकडे , तानाजी जाधव , गुलाब थोरबोले, राहुल कांबळे , मल्हारी करे, यासह अनेक भालके गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.  या बैठकीत मारोळी ,सलगर बुद्रुक, शिरनांदगी ,भोसे, आसबेवाडी ,लवंगी ,चिक्कलगी ,हुन्नुर, निंबोणी गावातील लोकांना एकत्रित करण्यात आले होते. नानांनी केलेली कामे हीच नानांची ओळख तर मतदारसंघातील जनता हीच संपत्ती आहे .त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन यावेळी बसवराज पाटील यांनी केले.

फोटो -
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भगीरथ भालके
test banner