आज समाजात महिला सुरक्षित नसताना गृहखाते नेमके करते तरी काय! -रुपालीताई चाकणकर - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

आज समाजात महिला सुरक्षित नसताना गृहखाते नेमके करते तरी काय! -रुपालीताई चाकणकर

         
                                                        मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून  मेक इन  इंडिया व डिजिटल इंडिया मध्ये ही गंभीर बाब आहे . आज महिला ही सुरक्षित नसल्याने गृहखाते नेमके  करते  तरी काय असा सवाल करीत फडणवीस सरकार महिलांच्या सुरक्षत्याबाबत अपयशी ठरले असल्याची टीका  राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी मंगळवेढा येथे पत्रकार परिषदेत केली.
  मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना मागील दोन दिवसांपूर्वी घडली होती पीडित कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केले हा खटला फास्ट न्यायालयात चालून आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांनी यावेळी मागणी केली या घटनेत पोलिसांनी लावलेली कलमे योग्य आहेत का याची  पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसाकडे विचारपूस केली. राज्यामध्ये महिलावर अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत परिणामी राज्यातील महिला असुरक्षित  बनू पाहत असल्याचे त्या  म्हणाल्या. मुख्यमंत्री प्रत्येक घटनेत कारवाई केल्याचे सांगताहेत मात्र प्रत्यक्षात तसे घडत नसल्याचा आरोप त्यांनी केला. चिमूर मतदार संघाचे आमदार यांनी एका महिला पोलिसांचा विनयभंग केला अद्यापही या  आमदारांवर कारवाई झालेली नाही नागपूरमध्ये स्मशानभूमीत एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला त्याच बरोबर सहा हत्या झाल्या नागपूर हे मुख्यमंत्र्याचे गाव असून त्यांच्या गावात अशी परिस्थिती असेल तर राज्यात  काय स्थिती असेल याचा विचार करणे गरजेचे आहे .  सन २०१८ पासून बत्तीस हजार महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडल्या आहेत बिहार पेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होत असल्याचे भयावह चित्र आहे.  सरकार केवळ जाहिरातबाजी करू पाहत आहे प्रत्यक्षात विकास कामे केली जात नाहीत . सरकारला महिलांची भीती का वाटते. मलाही पुण्यात नजरकैदेत ठेवले होते असे त्या म्हणाल्या . महिलाबाबत सरकार कडून केलेल्या या अन्यायकारक वागणुकीचा विपरीत परिणाम  होईल . महिला या सरकारला निश्चितच धडा शिकवतील .  कोपर्डी तील घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा न दिल्याने पीडित मुलीला  अद्यापही  न्याय मिळालेला नाही. या पीडित कुटुंबियाला  कधी न्याय मिळणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला . राज्यात  ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद चंद्रजी पवार यांच्या जीवावर मोठे होऊन पक्ष सोडून गेले आहेत अशा नेत्यांना घरी बसल्या शिवाय राष्ट्रवादी आता  स्वस्त बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी इशारा दिला पाच वर्षात फडणवीस सरकारने विकासाचे राजकारण करण्यापेक्षा फोडाफोडीचे राजकारणात रस दाखवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्यामध्ये फडणवीस सरकारने १६  शेतकऱ्यांच्या पत्नीचे कुंकू पुसण्याचे पाप  केले आहे  शेतकऱ्यांना वीज बिल माफी, कर्ज माफी अद्यापही दिलेली नाही हे  सरकार शेतकऱ्यांचे नसून उद्योगपतीचे  असल्याचे ते म्हणाले
चौकट-- पत्रकार परिषदेला परवानगी घेतली आहे का याची विचारणा आचारसंहिता पथकातील कर्मचाऱ्यांनी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्याकडे केल्यानंतर त्याने आश्चर्य व्यक्त करीत पत्रकार परिषदेला परवानगी ची काय गरज आहे  आपल्याला याबाबत पुरेसे ज्ञान आहे का असा सवाल करून संबंधित आचार संहिता पथकातील कर्मचार्‍यांना खडसावले महिला प्रदेशाध्यक्ष चा रुद्रावतार पाहून त्या पथकातील कर्मचार्‍यांनी त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला

चौकट--- राज्यभर शरद पवार यांच्या सभांना युवकाकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून फडणीस सरकार पुरते घाबरले आहे त्यांनी कथित राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार यांचा संबंध नसताना नाहक गुन्हे दाखल करून युवकांमध्ये उद्रेक निर्माण केला आहे बारामतीसह फलटण येथे बंदची हाक देऊन राष्ट्रवादी ने निषेध नोदविला आहे यापुढचा आंदोलन ईडी अधिकाऱ्यांच्या घरासमोर होईल असे त्यांनी यावेळी सांगितले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भान ठेवून बोलावे अन्यथा आम्ही त्याला सडकून उत्तर देऊ म्हणाल्या.
यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा अनिताताई नागणे,  ऍड विनायक नागणे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सुवर्णा बागल, जिल्हा उपाध्यक्ष तृप्ती सरोदे श्रीकांत शिंदे संदीप मांडवे दत्तात्रय भोसले संदीप बुरकुल यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
test banner