मंगळवेढा येथे जुगार अड्यावर छापा २६ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढा येथे जुगार अड्यावर छापा २६ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त

 
                                                        मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथे ५२ पानी मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्डयावर पोलीस अधिक्षक सोलापूर यांच्या विशेष पथकाने छापा टाकून २६ लाख २१ हजार ३७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून मुंबई जुगार ॲक्टखाली १६ जणांविरूध्द गुन्हे नोंदवून ताब्यात घेण्यात आले.

या घटनेची हकिकत अशी की, शिरसी येथे मन्ना नावाचा जुगार अड्डा चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने दि. २० रोजी सायंकाळच्या दरम्यान विशेष पथकाने छापा टाकला असता यामध्ये मुकुंद भिमराव सरगर (वय ४१, पंढरपूर), प्रविण सिध्देश्­वर नागणे (वय ३८, मंगळवेढा), नवनाथ कुबेर मेटकरी (वय ४०, बठाण), धर्मराज कोंडीबा बाबर (वय ३६, मानेगाव), आनंद ज्ञानू ताड (वय ४१, रा.मुंबई), विनोद अंबादास शिंदे (वय ३०, लक्ष्मीदहिवडी), प्रविण ईश्वर चव्हाण (वय ३०, रा.पंढरपूर), सचिन नामदेव चव्हाण (वय ३३, मंगळवेढा), विकास बाबासाहेब बेदरे (वय४४, बठाण), भिमराव नामदेव मुदगूल (वय ३५, रा.मंगळवेढा), बंडू सरकळे (वय २६, रा.मंगळवेढा), सुरेश जयवंत कट्टे-पाटील (वय ५१, मंगळवेढा), सूर्यकांत नारायण घंटी (वय १९, रा.पंढरपूर), नितीन दामोदर इंगळे (वय ३५, रा.मंगळवेढा), प्रविण नारायण लेंडवे (वय ३०, रा.पाटखळ), संदेश नागेश लोखंडे (वय २२, भीमनगर, मंगळवेढा) आदीजण ५२ पानावर मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या छाप्यात १६ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १० मोबाईल,एक डिलक्स हिरो कंपनीची मोटर सायकल, दोन चारचाकी गाड्या असा एकूण २६ लाख २१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे..


test banner