युटोपियन शुगर्स चे शेती अधिकारी धनंजय व्यवहारे भारतीय शुगर च्या उत्कृष्ट शेती अधिकारी पुरस्काराने सन्मानित. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

युटोपियन शुगर्स चे शेती अधिकारी धनंजय व्यवहारे भारतीय शुगर च्या उत्कृष्ट शेती अधिकारी पुरस्काराने सन्मानित.



मंगळवेढा(प्रतिनिधी )भारतीय शुगर पुणे यांच्या वतीने आयोजित ७ व्या वार्षिक संमेलन आणि शुगर एक्सपो २०१९ या कार्यक्रमा अंतर्गत देण्यात येणार्‍या मानाच्या उत्कृष्ट शेती अधिकारी पुरस्काराने युटोपियन शुगर्स चे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांना दि. २१ सप्टेंबर २०१९ रोजी श्री शाहू संस्कृतिक मंदिर कोल्हापूर येथे भारतीय शुगर चे अध्यक्ष श्री विक्रमसिंह शिंदे, भारतीय शुगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह शिंदे,जयंत शुगर्स लि.कराड चे अध्यक्ष सी.एन.देशपांडे,श्री.पांडुरंग सह.सा.का.चे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यवहारे यांनी सपत्नीक,सहपरिवार हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरण प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,चिफ फायनान्सीयल ऑफिसर दिनेश खांडेकर,डे.चिफ इंजिनियर पी.एस.पाटील, डे.चिफ केमिस्ट दीपक देसाई, कामगार कल्याण अधिकारी रविराज पाटील, ई.डी.पी.मॅनेजर अभिजीत यादव,ऊस पुरवठा अधिकारी कृष्णात ठवरे, ऊस विकास अधिकारी डॉ.संतोष पाटील,स्टोअर कीपर गणपत फाळके, सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.

  या पुरस्कारा बद्दल बोलताना उत्तमराव पाटील म्हणाले की,या पुरस्काराने युटोपियन शुगर्स च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला असल्याचे मत कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी व्यक्त केले कमीत-कमी कालावधीमध्ये युटोपियन शुगर्स चे शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनी महत्वपूर्ण कामगिरी करून शेती क्षेत्रामध्ये नविन विचारधारा अमलात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने व शेती क्षेत्रामध्ये नव-नविन तंत्रज्ञानाचा वापर करून युटोपियन शुगर्स च्या प्रगती मध्ये ही मोलाचा हातभार लागला आहे. या पुरस्काराने कारखान्याच्या शेती विभागामध्ये उत्साहाचे वातावरण तयार होऊन शेती विभागास नव ऊर्जा मिळणार असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

या पुरस्कारा बद्दल कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक,पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक यांनी व्यवहारे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



फोटो ओळी: भारतीय शुगर पुणे यांच्या वतीने आयोजित ७ व्या वार्षिक संमेलन आणि शुगर एक्सपो २०१९ कार्यक्रमा अंतर्गत देण्यात येणार्‍या मानाच्या उत्कृष्ट शेती अधिकारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना युटोपियन शुगर्स चे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.भारतीताई व्यवहारे, वडील श्री.अंकुश व्यवहारे,दिसत आहेत.
test banner