मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवूनच मी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला- आ.प्रशांत परिचारक - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवूनच मी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला- आ.प्रशांत परिचारक

 
                                                                      मंगळवेढा (प्रतिनिधी) पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात गत निवडणुकीत अनेक मतदारांनी मतदान केले आणि कार्यकर्तेनी परीश्रम घेतले त्यांच्या काही अपेक्षा भावना लक्षात घेऊनच मी यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असून आमच ठरलंय पण जे ठरलंय ते लवकरच कळणार असे सुचक विधान करत विधानसभा लढविणार असल्याचे संकेत आ. प्रशांत परिचारक यांनी दिले.
       म्हैसाळ योजनेमध्ये नव्याने सहा गावांचा समावेश झाला याची माहिती देण्यासाठी मंगळवेढा येथील पंढरपूर अर्बन बँकेच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना  आ परिचारक म्हणाले की आपण सहयोगी आमदार असून विधानसभेच्या पटलावर अपक्ष आमदार म्हणून नाव आहे.त्यामुळे भाजपात  प्रवेश व उमेदवारीवर कार्यकर्त्यांशी बोलून निवडणूक लढविण्याबाबत त्या त्या प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेणार आहे.सध्या युतीची चर्चा सुरू असून हा मतदारसंघ भाजपा,शिवसेना व रयत क्रांतीमध्ये कोणत्या पक्षाला सुटणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.युतीबाबत मुख्यमंत्र्यांचे भुमिका स्पष्ट आहे.त्यामुळे पक्षात प्रवेश करणाराची संख्या वाढू लागली.त्यामुळे काहींना हिरवा तर काहींना रेड सिंग्नल मिळत आहे. म्हैसाळ योजनेत नव्याने सहा गावाचा समावेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने झाला असून 774 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.त्यासाठी जवळपास 11 कोटीपेक्षा अधिक  खर्च येणार आहे.बंद पाईपलाईन पाणी दिल्याने बचत होणार असून ते पाणी मारोळी व शिरनांदगी तलावात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.या पाण्याचे श्रेय कुणाला यावर बोलताना ते म्हणाले की या भागात आंदोलन करणाय्रा जनतेचे आहे.त्यानी एकजूट दाखवली आणि माध्यमातून हा प्रश्न सकारात्मक मांडल्याने या प्रश्नाला अखेर न्याय मिळाला.                            यावेळी रतनचंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहूल शहा,आरोग्य शिक्षण माजी सभापती शिवानंद पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर शिवाजी नागणे,अरूण किल्लेदार, रामकृष्ण नागणे,नगरसेवक प्रशांत यादव,बबन ताड,मधुकर चव्हाण आदी उपस्थित होते
test banner