मंगळवेढा:-
मंगळवेढा शहरातील जागृक नागरिक व विविध सामाजिक संस्था यांना एकत्र घेऊन एक दिवस गावासाठी गावाच्या विकासासाठी हा उपक्रम १ जानेवारी २०२६ पासुन सुरू होणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सतीश दत्तू यांनी दिली.
सध्या मंगळवेढा नगरपरिषदेची निवडणूक सुरू आहे. येणाऱ्या काळात मंगळवेढा नगरपरिषदेवर कोणाचीही सत्ता येवो,आपण शहरातील जागृक नागरीक व वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी,सदस्य दर रविवारी एकत्र येऊन मंगळवेढा शहरातील विविध समस्या,पायाभूत सुविधा,स्वच्छता व आरोग्य,शहर सौंदर्यीकरण,सामाजिक व शैक्षणिक उपक्रम,प्रशासकीय सेवा,सुरक्षा,पाणी व स्वच्छता योजना व जनतेच्या तक्रारींचे निवारण त्यावरील उपाय व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कामे यावरती विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे.
त्या मागण्यांचे लिखित स्वरूपात निवेदन तयार करून पुढील रविवार पर्यंत त्याचा पाठपुरावा सर्वांनी मिळून करायचा आहे,तरी देखील दखल न घेतल्यास सोशल मीडिया व प्रिंट मीडिया यांच्याद्वारे बातमी प्रसारित करण्यात येणार आहे,त्यामुळे प्रशासनाला त्याची दखल घ्यावीच लागणार आहे.
शहरातील समस्या संदर्भात व्यक्तिगत प्रयत्न करण्यापेक्षा सामूहिक प्रयत्न केला तरच भविष्यकाळात त्याचे चांगले बदल मंगळवेढा शहरात आपणाला दिसतील यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन एक दिवस गावासाठी गावाच्या विकासासाठी ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर मंगळवेढा नगरपरिषद प्रशासन व शहरातील सामान्य नागरिकांनी दर रविवारी एकत्र येऊन अनेक कार्यक्रम राबवता येऊ शकतात यामध्ये मंगळवेढा शहरातील संतांची स्मारके होण्यासाठी मोठा लढा उभा करणे तसेच वेगवेगळ्या योजनांची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणे असे अनेक उपक्रम आपण एकत्रितरित्या राबवू शकतो.
चला तर मग आपल्या गावासाठी आपण एक दिवस देऊया व गावात बदल घडवून गावाचा सर्वांगीण विकास करूया.

