मंगळवेढा:-
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले असुन सदरचा महादेवी हत्ती परत नांदणीच्या मठात आणण्यासाठी मंगळवेढ्याच्या वारी परिवार सायकल क्लबने मात्र मंगळवेढा -कोर्टी -मंगळवेढा अशी ६८ किलोमीटरची सायकल राईड काढून महादेवी हत्ती परत आणाची हाक दिली आहे.
नांदणी मठ हा जैन धर्मियांचे श्रद्धेचं ठिकाण मानले जाते अशा मठात मागील ३३ वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीणीचा सांभाळ करण्यात आला होता त्यामुळे सबंध कोल्हापूर जिल्ह्याचा महादेवी हत्ती हा अंत्यन्त श्रद्धेचा व जिव्हाळ्याचा विषय झाला होता अशातच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा येथे नेण्यात आलं आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण भावूक झाले असुन सर्वत्र नाराजीचे वातावरण आहे.
महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्याच्या मागणी करिता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वाक्षरी मोहीम,पदयात्रा होत असुन मंगळवेढ्याच्या सायकल क्लबने मंगळवेढा-एकलासपूर-अनवली पंढरपूर-महाद्वार-नामदेव पायरी-स्टेशन रोड-कोर्टी आदी मार्गांवरती परत आणा परत आणा महादेवी हत्ती परत आणा,महादेवी हत्ती आहे आमची शान सरकारने ठेवावे याचे भान,नको वनतरा नको वनतरा महादेवी आणू कोल्हापूरा,महादेवी हत्ती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची असा नारा देऊन कोल्हापूरकरांना आम्ही आपल्या सोबत आहोत हा संदेश दिला आहे.
महादेवी हत्ती प्रित्यर्थ श्रद्धा,भावना आणि सामाजिक भान याचे दर्शन घडविणाऱ्या सायकल राईडमध्ये क्लबचे अध्यक्ष स्वप्निल टेकाळे,शिवन्या कलुबर्मे,कमलेश माळी,सिद्धेश्वर डोंगरे,गणेश मोरे,पांडुरंग कोंडूभैरी,नंदकुमार नागणे,अविराज जाधव,समर्थ महामुनी,दत्ता जाधव,प्रा.महेश अलिगावे,चंद्रजीत शहा,महादेव दत्तू,आकाश साबळे,संजय जावळे,अरुण गुंगे,राजाभाऊ गणेशकर,नाना भगरे,प्रा.विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू आदी सायकलस्वार सहभागी होते.
यावेळी कोर्टी गावचे सरपंच राजू पवार उपसरपंच महेश येडगे,संतोष डोंगरे,लक्ष्मण भगत,सतिश भाऊ दत्तू,जाहिद बागवान यांचे विशेष सहकार्य लाभले.