जय जवान गणेशोत्सव सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अरूण गुंगे यांनी दिली.
बुधवार दिनांक 27/8/25 रोजी सायंकाळी 6 वाजता गणेश प्रतिष्ठापना रात्री 7 वाजता कुमारी संकष्टी कागवाडकर यांचे व्याख्यान विषय राष्ट्रमाता जिजाऊ.
गुरुवार दिनांक 28/8/25 रोजी सायंकाळी 6 वाजता होम मिनिस्टर निवेदक भारत मुढे शुक्रवार दिनांक 29/8/15 रोजी सायंकाळी 7 वाजता उत्कर्ष क्षीरसागर यांचे व्याख्यान विषय गणेशोत्सव काल आज उद्या शनिवार दिनांक 30/8/25 रोजी 7 वाजता भजन संध्या साजरकर्ते मस्तान मुल्ला.
रविवार दिनांक 31/7/25 सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिर रक्तपेटी अक्षय ब्लड बँक सोलपूर सकाळी 10 वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिर शिबिरामध्ये खालील तपासण्या केल्या जातील BP, Sugar,ECG,थायरॉईड,पेशंटना गरजेनुसार तीन दिवसाच्या औषधे व गोळ्या मोफत दिल्या जातील.
सोमवार दिनांक 1/9/25 रोजी अन्नदान मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर व मंगळवेढा स्मशानभूमी मध्ये गाईला चारा वाटप मंगळवार दिनांक 2/9/25 रोजी एक घर एक झाड प्रत्येक कुटुंबास एक कुंडी व एक झाड वाटप बुधवार दिनांक 3/9/25 रोजी संध्याकाळी 5 वाजता भजन आसावरी भजनी मंडळ मंगळवेढा रात्री 8 वाजता भारुड साजरकर्ते लक्ष्मण राजगुरू महाराज बावडा गुरुवार दि 4/9/25 रोजी रात्री 8 वाजता ज्ञानेश्वरी घाडगे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे.