मंगळवेढा:-
मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना व वारी परिवाराच्या वतीने कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून २६ जुलै कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
सुरवातीस सैनिकांच्या शौर्याची प्रतिक असलेल्या बंदुकीचे पुजन वीरपत्नी सविता ठोंबरे,लक्ष्मी पवार,कविता मेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शशिकांत चव्हाण म्हणाले माजी सैनिक संघटनेच्या मागणी असलेल्या शहीद स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार.
कार्यक्रमासाठी मेजर बाळासाहेब पवार,शशिकांत चव्हाण,नारायण गोवे,अजीत जगताप, सोमनाथ आवताडे, राजाभाउ चेळेकर,रमेश जोशी,दत्तात्रय भोसले, मीनाक्षी करमुते,क्रांती दत्तू तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य व वारी परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
सदर देशभक्तीपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मलय्या स्वामी,सूत्रसंचालन भारत मुढे व आभार चंगेजखान इनामदार यांनी केले.