मंगळवेढा प्रतिनिधी :
श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची मिटिंग अध्यासी अधिकारी मा. विजय वाघमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेत नूतन चेअरमन पदी मा.भिमाशंकर तोडकरी व व्हाईस चेअरमनपदी मा.सुनिता काकडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नूतन चेअरमन व नूतन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.तसेच मावळते चेअरमन शिवाजी गणपाटील व मावळते व्हाईस चेअरमन रावजी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच सहाय्यक निबंधक मा. विजय वाघमारे साहेब यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक संघाचे नेते मा.संजय चेळेकर यांनी दामाजी पतसंस्थेचा इतिहास सांगताना सभासदांच्या सेवेसाठी कार्यरत असणारी सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शिक्षकांची एक आदर्श पतसंस्था असल्याचे सांगितले.
सर्व संचालक मंडळ एक रुपयाही भत्ता न घेता सभासदांच्या हितासाठी कार्य करत आहे.
सभासद कर्ज मर्यादा सहा लाखावरून सात लाख केलेली आहे . सर्वाना समान कर्जवाटप , कर्जाचा व्याज दर ८ .४० % व लाभांश 12% देणे ,तसेच इतर अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्याबाबत पतसंस्था अग्रस्थानी आहे .
दामाजी पतसंस्था सभासद पाल्यांच्या गुणवत्तेसाठी पारितोषिक देणे व विशेष सन्मान करून प्रोत्साहन देणारी एक आदर्श संस्था मानली जाते.विविध क्षेत्रातील आदर्श काम करणाऱ्या व यश संपादन केलेल्या विद्यार्थी,गुणी शिक्षकांचा व शाळांचा सन्मान करत आली आहे.
याप्रसंगी शिक्षक संघाचे सल्लागार कांताराम बाबर,शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संभाजी तानगावडे,सरचिटणीस राजेंद्र केदार,, संचालक विष्णू आसबे , धनाजी ना गणे ,धनाजी जगदाळे,धर्मराज जाधव,गौतम दोडके, रामचंद दोलतडे ,प्रदीप यादव, चंद्रकांत माने, अनिता भिंगे, अशोक मलगोंडे ,अशोक लेंडवे, कविराज दत्तू ,सुहास लेंडवे , निवास माळी ,शिवाजी नकाते, शिवाजी लेंडवे, दत्तात्रय वाघ , प्रविण कोष्टी ,विलास जाधव, सुकदेव डांगे , चंदकांत कोरे , गंगाराम चव्हाण, पांडुरंग बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी यांच्याकडून नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. आभार सचिव मोहन लेंडवे यांनी मानले .