मंगळवेढा:-
छत्रपती संभाजी महाराज भाषा,कुशल राजकारणी,नेतृत्व, चारित्र्यसंपन्न होते.परंतु संभाजी महाराज यांची वेगवेगळ्या पद्धतीने आजही बदनामी केली जाते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा खरा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर आणणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन शिवचरित्र अभ्यासक प्रकाश मुळीक यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.ते म्हणाले राजमाता जिजाऊ यांच्या सान्निध्यात संभाजी महाराज सर्व गोष्टीत तरबेज झाले अध्यात्म, राजकारणासह विविध विषयांवरील ग्रंथ त्यांनी लिहिले.
कमी वयात युद्धमोहिमांचे नेतृत्व करीत शौर्याने संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या सीमा वाढवत नेल्या. शिवाजी महाराजांनी स्वराज्य हिताच्या प्रत्येक जबाबदार्या त्यांनी पार पाडल्या.
प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करून योजना आखणे,त्याचे नियोजन करणे व अभ्यास करून त्याच्यावर विजय संपादन करणे हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या यशाचे सूत्र होते.
शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्यास लाभलेले ते छत्रपती होते. इतिहास अभ्यासक,संशोधकांनी संभाजी महाराज यांचा इतिहास नव्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळदादा नागणे व हर्षद डोरले तसेच दिगंबर भगरे,नारायण गोवे,मेजर बबन रोकडे,मदन पाटील,क्रांती दत्तू,सतीश दत्तू,विजय हजारे,विनायक सोमदळे,रतिलाल दत्तू,स्वप्निल फुगारे, अमोल मोरे उपस्थित होते.