स्मशानभूमीत संसार थाटून मृतदेहाची सेवा करणाऱ्या अनुराधा उप्पेवाड यांचा वारी परिवाराने केला सन्मान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ८ मार्च, २०२५

स्मशानभूमीत संसार थाटून मृतदेहाची सेवा करणाऱ्या अनुराधा उप्पेवाड यांचा वारी परिवाराने केला सन्मान.


मंगळवेढा:-

देशभरात 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झालेला असताना मंगळवेढ्यात मात्र वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने स्मशानभूमीत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला.


उच्च शिक्षित असून सुद्धा मंगळवेढ्याच्या स्मशानभूमीत आपल्या पतीबरोबर गुण्या गोविंदाने आणि तितक्याच धाडसाने संसार करणाऱ्या अनुराधा शिवराज उप्पेवाड यांचा वारी परिवाराच्या वतीने साडी,चोळी,फेटा,सन्मानचिन्ह,मिठाई व पुस्तके देऊन कर्तृत्ववान व धाडशी महिला म्हणून सुवर्णा मुळीक यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.


आज स्मशानभूमी म्हटल्यावर आपल्याला खूप भीती वाटते तसेच अनेक रूढी,अंधश्रद्धा मनात निर्माण होतात परंतु या सर्व गोष्टींना छेद देत समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपले आयुष्य खर्च करणाऱ्या अनुराधा उप्पेवाड खरोखरंच आदर्शवत व प्रेरणादायी आहेत.


आजच्या युगात उच्च शिक्षित असूनसुद्धा अनुराधाताईनीं स्मशान भूमीत संसार थाटला आहे रात्री,अपरात्री केव्हाही स्मशानभूमीत अंत्यविधी साठी मानवी देह येतात तरी देखील न घाबरता ती सुद्धा एक प्रकारची मानवसेवा आहे असे समजून आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे त्या उभ्या आहेत तसेच स्मशानभूमीची स्वच्छता ठेवण्यात कार्यरत आहेत.


आज कर्ता माणूस घरात नसला की स्वतःच्या घरात महिलांना भीती वाटते पण एक महिला स्मशानभूमीत वास्तव्यास असणे हे वाखणन्याजोगे आहे.


खरंतर प्रेरणा एखाद्या व्यक्तीकडून नाही तर त्यांनी केलेल्या कामातून घायची असते प्रत्येक महिला प्रसिद्ध होतेच असे नाही आपण आपल्या आजुबाजूला पाहिल्यावर लक्षात येईल कि आपल्या आजूबाजूला अशा ब-याच महिला आहेत ज्या प्रसिद्ध नाही पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरच काही आहे आणि हेच ओळखून वारी परिवाराने स्मशानजोगी म्हणून काम करणाऱ्या अनुराधा उप्पेवाड यांचा गौरव करून खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केला आहे.


यावेळी अनुराधा यांना त्यांच्या कामाबद्दल विचारले असता त्यानी सांगितले की स्मशानातील अंत्यविधीचे काम सुद्धा एक प्रकारची ईश्वरसेवाच आहे स्मशानात आलेल्या मृतदेहाची भीती वाटत नाही मोठया बंगल्यातच संसार होतो असे नाही तर स्मशानभूमीत सुद्धा संसाराचा गाढा चालवीता येतो त्यासाठी एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते.


आत्तापर्यंत असा माझा सन्मान कोणी केला नव्हता उलट आमच्या कामाची दखल घेऊन महिला दिनानिमित्त एका महिलेचा सन्मान तोही स्मशानभूमीत येऊन केल्याबद्दल वारी परिवाराचे त्यांनी आभार मानले.


यावेळी प्रकाश मुळीक यांनीही स्त्री शक्तीचा जागर घालीत उप्पेवाड कुटुंबाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे सांगत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी सासरे सुभाष उप्पेवाड,पती शिवराज उप्पेवाड, गोरक्ष गायकवाड,विलासराव आवताडे,रामचंद्र दत्तू,बाळासाहेब जाधव,मदन पाटील,पांडुरंग नागणे,रविकिरण जाधव,रतिलाल दत्तू,चंद्रकांत चेळेकर,प्रफुल्ल सोमदळे,अजय आदाटे,स्वप्निल टेकाळे सिद्धेश्वर डोंगरे,विजय हजारे,अरुण गुंगे,सतिश दत्तू आदी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले.


test banner