मंगळवेढा:-
महाशिवरात्री निमित्त मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लब व राजमाता परिवाराच्या वतीने पर्यावरणाच्या रक्षणार्थ मंगळवेढा-माचणूर जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली.
पाणी हे अमूल्य जीवन आहे पण आजच्या काळात देखील पाणी कोणीही वाचवत नाही सर्व सजीव सृष्टीला पाण्याची फार आवश्यकता आहे.
पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे लोक पाणी भरून गरज नसताना देखील नळ चालूच ठेवतात बऱ्याच ठिकाणी पाणी सुरू करून कपडे धुतले जातात,भांडी स्वच्छ केले जातात,अंघोळी साठी शॉवर चा वापर करतात त्यामुळे खूप पाणी वाया जाते आणि दुसरी कडे पाण्याच्या अभावी उन्हाळ्यात तहानलेले प्राणी,पक्षी मरण पावतात पाणी हा आपल्या जगण्याचा आधार आहे याला वाचविण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार म्हणून सदर सायकल रॅलीतून पाणी बचावचा नारा देण्यात आला.
तसेच सर्वत्र कडक उन्हाळा जाणवू लागला आहे त्यामुळे मानवाबरोबर पशु पक्षांना उन्हाच्या झळा असह्य हाऊ लागल्या आहेत त्यामुळे घरट्यातील पिल्ले पाण्यावाचून जीव सोडीत आहेत.
पाण्यासाठी पक्षांना दूरवरती भटकावे लागत आहेत वाढत्या उन्हात पक्षांच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमी व नागरिकांनी घराच्या अंगणात,झाडावरती,गच्चीवरती किंवा जिथे शक्य असेल तिथे पक्षांना पाणी आणि चारा ठेवून पक्षी संवर्धनासाठी हातभार लावावा असे आवाहन देखील माचणूरच्या यात्रेत आलेल्या लोकांना करण्यात आले.
तसेच सायकल चालवा इंधनाची बचत करा,यात्रेत स्वच्छता ठेवा व पर्यावरणाचे रक्षण करा असा प्रबोधनाचा जागर घालण्यात आला खरोखरचं वारी परिवार व राजमाता परिवाराने हाती घेतलेल्या पाणी व पक्षी बचाव उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
यावेळी जनजागृती रॅलीत डॉ.अशोक सुरवसे,राजेंद्र नलवडे,रामचंद्र दत्तू,नवनाथ दिवसे,महादेव दत्तू,मदन पाटील,सुनील भगरे,प्रदीप माळी,स्वप्निल वनगे,चेतन पाटील,गजानन घारगे,संतोष घाडगे,संजय नागणे,मेजर तानाजी हेंबाडे,दत्तात्रय आसबे,प्रकाश मुळीक,विष्णू भोसले,अरुण गुंगे,गणेश मोरे,भारत नागणे,प्रा महेश अलिगावे,रतिलाल दत्तू,शरद हेंबाडे,परमेश्वर पाटील,सौरभ नागणे,पांडुरंग कोंडूभैरी,स्वप्निल टेकाळे,ओम लुगडे,सिद्धेश्वर डोंगरे,प्रफुल्ल सोमदळे,शुभम टेकाळे,डॉ राहुल शेजाळ,चंद्रजीत शहा,प्रा.विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू,आदी सायकलस्वार उपस्थित होते.