मंगळवेढा:-
सद्यस्थितीत युवा पिढी मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी जात असून मंगळवेढा सारख्या संतनगरीच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक आहे हे ओळखून दिनांक ३१ डिसेंबर रोजी सायं ५ ते ९ यावेळेत मंगळवेढा पोलीस स्टेशन व वारी परिवाराच्या वतीने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व व्यसनमुक्तीचा संकल्प करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दामाजी चौकात दारू नको दूध पिऊया या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरवातीस श्री विठ्ठलाच्या मूर्तिचे पूजन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड,मंगळवेढा स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेशकुमार ढवाण,रमेश जोशी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डीवायसापी गायकवाड म्हणाले आज घरामधील एक कर्ता पुरूष दारूमुळे मरण पावला तर ते कुंटूब रस्त्यावर येते मग त्या स्त्रीने करायचे काय यासाठी दारूमुक्तीसाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे.व्यसनमुक्त तरूणच खरी देशाची संपत्ती आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असतात त्या अनुशंगाने मोठया प्रमाणावर हुल्लडबाजी,दारू पिऊन वाहन चालविणे,सांयलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठा आवाज करणे त्यामुळे शांतता व सुव्यवस्था भंग पावते तसेच दारूमुळे अपघात होतात,काही लोक मृत्युमूखी पडतात तर काहीजण जखमी होतात परिणामी त्यांच्या कुंटुबाचा आधार गेल्याने संपूर्ण कुंटुब रस्त्यावर येते अशा घटना घडू नयेत याची काळजी घेतली पाहिजे.
यावेळी पोलीस निरीक्षक ढवाण म्हणाले नववर्षांच्या आदल्या रात्री अनेक वाहनचालक दारू पिऊन वाहन चालवितात परिणामी मृत्युला निमंत्रण देतात दारू पिऊन गाडी चालवीणाऱ्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे याकरिता वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी लोकांनी स्वतःहून सहभाग वाढविला पाहिजे.
आज तरुणपिढीमधली वाढती व्यसनधिनता ही बाब खरोखरच गंभीर आहे यासाठी येणाऱ्या पिढीला द दारूचा नाही,तर द दुधाचा आहे हे पटवून देणे आवश्यक आहे आणि यासाठीच वारी परिवाराने हाती घेतलेले कार्य खूपच कौतुकास्पद आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करताना व्यसन सोडून निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करावा असे आवाहन करून त्यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.दारू नको दूध पिऊया या उपक्रमाचे सलग सातवे वर्ष असून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या हस्ते नागरिकांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.
यावेळी २३०० लोकांना दुधाचे वाटप करण्यात आले यावेळी डॉ. शरद शिर्के,दत्तात्रय खडतरे,राजेंद्र माळी,रामचंद्र दत्तू,अरुण गोवे,दत्तात्रय भोसले,प्रा.येताळा भगत,दत्तात्रय तोडकरी,रामचंद्र कुलकर्णी,शरद हेंबाडे,नागेश डोंगरे,राहुल घुले,विठ्ठल बिले,संजय इंगळे,चंद्रकांत काकडे,संजय मोरे,बाळासाहेब जाधव यांचेसह माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधीकारी,सदस्य,शिवप्रतिष्ठनचे सर्व सदस्य,खेळाडू वारी परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सदर उपक्रमाचे प्रास्तविक अजित जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले.