मंगळवेढा:-
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रकृती परीक्षण देश का प्रकृती अभियान अंतर्गत श्री संत दामाजी महाविद्यालयातील शिक्षक व विदयार्थ्यांची प्रकृती परीक्षण या ऍपद्वारे माहिती भरून नाडी तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय आयर्वेद संस्थानामध्ये आयुर्वेद दिवस या शुभ दिवसावर राष्ट्रव्यापी अभियान देश का प्रकृती परिक्षणाची घोषणा केली होती.
त्याला प्रतिसाद देत महाविद्यालयात लोकनेते राजारामबापू पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय इस्लामपूर जि.सांगली येथील डॉ.सादिक मुजावर यांनी २३ शिक्षक व १९२ विदयार्थ्यांची तपासणी केली,प्रत्येकानी वेळच्या वेळी व्यायाम आणि नियंत्रित आहार घेतला तर उत्तम आरोग्य राहण्यास मदत होते असे सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव,उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांचेसह विदयार्थी उपस्थित होते.