मंगळवेढा :
श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अंतर्गत महिला सुरक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
सुरवातीस संस्थापक स्व रतनचंद शिवलाल शहा यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण,प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक ढवाण म्हणाले आत्ताचे वातावरण बघता ते अत्यंत गढूळ झाले आहे महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होताना दिसत आहेत हे जर थोपवायचे असेल तर मुलींनी न घाबरता व्यक्त होणे आवश्यक आहे आपल्यावर अन्याय अत्याचार होतो असे वाटल्यास विद्यार्थिनींनी अशावेळी शांत न बसता विरोध करायला शिकले पाहिजे व पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे.
आता मुलीनी पळून न जाता छेडछाड करणाऱ्याला पळवून लावण्याचे दिवस आणले पाहिजेत मुलींना गुड टच व बॅड टच मधला फरक ओळखता आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज,शाहू फुले,आंबेडकरांच्या पुरागामी विचारांच्या महाराष्ट्रात बदलापूर सारख्या घडणाऱ्या घटना खूपच निंदनीय आहेत अशा नराधमांपासून वेळीच सावध राहून त्यांना धडा शिकवीला पाहिजे यासाठी मुलीच्या अडचणीसाठी दामाजी महाविद्यालयात तक्रार निवारण समिती कार्यरत आहे याचे ढवाण यांनी विशेष कौतुक केले.
विदयार्थ्यांची कोणतीही अडचण असेल तर आपल्या सेवेसाठी पोलीस बांधव सदैव आपल्या पाठीशी असतील असा विश्वास देऊन ढवाण यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरातून संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जाधव म्हणाले विद्यार्थिनींनी अन्यायाला विरोध केला पाहिजे आपण शांत बसल्यास अन्याय करणाऱ्यांची ताकद वाढत जाते यासाठी स्वरक्षणासाठी आता सज्ज झाले पाहिजे यासाठी मुलींची कोणतीही अडचण असल्यास महाविद्यालयात असलेल्या तक्रार पेटीचा उपयोग करावा असे सांगितले यावेळी
उपप्राचार्य प्रा राजेंद्र गायकवाड, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ परमेश्वर होनराव, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ नवनाथ जगताप,यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विनायक कलुबर्मे यांनी तर सूत्रसंचालन डॉ राजकुमार पवार यांनी केले तर प्रा धनाजी गवळी यांनी आभार मानले.