मंगळवेढा:-
श्री विद्या विकास मंडळ श्री संत दामाजी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या अकरावी विदयार्थ्यांचे स्वागत प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव,उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
दिनांक १५ जुलै रोजी इयत्ता ११ वी कला,वाणिज्य व शास्त्र शाखेतील विदयार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.
यावेळी प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी महाविद्यालय सज्ज असून महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सर्वच भौतिक साधनांचा उपयोग विदयार्थ्यांनी करून घ्यावा तसेच निकालाची उज्वल परंपरा विद्यार्थी कायम राखतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सर्व मुलांनी व पालकांनी कॉलेज वरती टाकलेल्या विश्वासाबद्दल आभार मानून सर्वांचे स्वागत केले.
प्रा.गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त करून विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व विभागातील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले तर प्रा.धनाजी गवळी यांनी आभार मानले.