संत चोखोबांच्या स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल:-आ.समाधान आवताडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १६ जुलै, २०२४

संत चोखोबांच्या स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल:-आ.समाधान आवताडे


मंगळवेढा:-

संतभूमी म्हणून ओळख असलेला मंगळवेढा येथील संत परंपरेतील महान संत चोखामेळा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारणी संदर्भातील काम लवकरच दृष्टीक्षेपात येईल या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असल्याचे आमदार समाधान आवताडे यां पत्रकारांशी बोलताना सांगितले.


पुढे बोलताना ते म्हणाले की राज्याच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात देहू व आळंदी सोबत मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या स्मारकासाठी २५ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.


याबाबत वारी परिवार सक्रिय पणे प्रश्नाबाबत पाठपुरावा करीत असल्याने आषाढी वारी आढावा बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते पंढरपूर दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेत स्मारक उभरण्याकरिता वारी परिवाराचे सतीश दत्तू,प्रा.विनायक कलूबर्मे,सोमनाथ आवताडे,गणेश ओमने,प्रफुल्ल सोमदळे, शशिकांत चव्हाण,अविनाश शिंदे,जयराज शेंबडे,सुदर्शन यादव यांच्यासह आदी पदाधिकारी शिष्ट मंडळ न घेऊन तात्काळ निधी वर्ग करून काम सुरू करण्याबाबत संबंधित विभागाला आदेश द्यावेत ही विनंती केली या विनंतीला मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. 


या स्मारकाचा प्रश्न काही दिवसात मार्गी लावणार असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.


मंगळवेढा भूमी ही चोखोबांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून खूप भाविक भक्त येत असतात. 


अशा या महान संतांचा गौरव व्हावा यासाठी भव्य दिव्य स्मारक उभा करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आ. आवताडे यांनी सांगितले.


test banner