मंगळवेढ्यात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ६ जून, २०२४

मंगळवेढ्यात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.




मंगळवेढा:-

मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने ६ जुन रोजी शिवालय येथे शिवराज्याभिषेक दिन मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला.


सुरवातीस सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांच्या हस्ते शिवमुर्तीवर दुग्धभिषेक करण्यात आला तसेच पाच प्रकारचे धान्य,नाण्याचा अभिषेक करून पुषवृष्टी करण्यात आली.


याप्रसंगी ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र घेवून शिवरायांना अभिवादन करुन राज्याभिषेक सोहळानिम्मित पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी प्रकाश मुळीक व प्रा विनायक कलुबर्मे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्व सांगून शुभेच्छा दिल्या तर स्वप्निल फुगारे यांनी गारद देऊन जयघोष करण्यात आला. 

तसेच अक्षर आयटी वर्ल्ड यांच्या वतीने सारथी संस्थेकडून मराठा समाजातील मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात आले त्याबद्दल सन्मान करण्यात आला.


यावेळी शिवाजी वाकडे,मारुती गोवे,अजित जगताप,चंद्रशेखर कौंडूभैरी,विलास आवताडे,दिगंबर भगरे, दत्तात्रय भोसले,शरद हेबांडे,राहुल सावंजी,प्रा. सचिन इंगळे,आनंद मुढे,विजय हजारे,प्रफुल्ल सोमदळे,रतिलाल दत्तू,शैलेश गोवे,प्रतीक पडवळे,लहू ढगे,प्रदीप गायकवाड,अजय गाडे,अविनाश गवळी,सचिन गोवे,संजय इंगळे,सचिन साळूंखे,संभाजी घुले,अनिकेत गवळी,सुरज गायकवाड,प्रतीक भगर,संतोष दत्तू,जमीर इनामदार,सतिश दत्तू यांचेसह अनेक शिवभक्त व जिजाऊच्या लेकी उपस्थित होत्या.


test banner