महाराष्ट्राची शान असलेला फेटा अखेर रुसला. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १८ जून, २०२४

महाराष्ट्राची शान असलेला फेटा अखेर रुसला.


मी १६ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता आमचे पाहुणे व माझा विद्यार्थी मनोज आवळेकर याच्या मुलाच्या नामकरण व आईच्या ५० व्या वाढदिवसाच्या  सोहळ्यासाठी जोगेश्वरी मंगल कार्यालयात गेलो होतो.


त्याअगोदर तेथे दुपारीच एक कार्यक्रम झाला होता.त्या कार्यक्रमातील मान्यवरांना घातलेल्या फेट्याचा ढीग पहिल्यानंतर खूपच वाईट वाटले तिथे असे एकूण १० ते १२ फेट्याचे ढीग पडलेले असावेत एका ढिगाऱ्यात साधारण ८ ते ९ फेटे होते याची बेरीज केली तर १०५ ते ११० फेटे असावेत याचाच अर्थ एक फेटा ५० रुपयास धरला तर ५५०० रुपये होतात अशा कितीतरी कार्यक्रमात फेटे नेसवून खरोखरच आपण किती पैशाची नासाडी करीत आहोत याची जाणीव झाली.


कार्यक्रमात सर्वच पाहुणे असल्यामुळे एकतर कोणाचाच सत्कार करू नये या मताचा मी आहे तुरा काढून फेटा बांधून फोटो काढतो खरंतर त्या फेट्यामूळेच आपला फोटो भारी निघतो आणि एकदा का फोटो काढला की लगेचच फेट्याला काढून आपण मोकळे होतो यालाच म्हणतात गरज सरो आणि वैद्य मरो एकतर फेटा बांधायला वेळ लागतो आणि बांधलेला फेटा ज्या खुर्चीवर आपण बसतो त्याच खुर्चीवर ठेवून जातो मग ते फेटे अस्ताव्यस्त पडलेले असतात,वाऱ्याने कार्यक्रम स्थळाच्या परिसरात पडलेले असतात आणि मग महाराष्ट्राची शान असलेला तुऱ्याचा व रुसलेला शाही फेट्याची केविलवाणी अवस्था पाहून खूपच वाईट वाटते लोकांनी आता बदलण्याची गरज आहे.


फेट्याऐवजी शाल देऊन सत्कार केला तर लोक शाल घरी तर घेऊन जातात व तिच शाल थंडीच्या दिवसात रस्त्यावर झोपलेल्या व थंडीने कुडकूडणाऱ्याला पांघरली तर गाडगे बाबांच्या विचारातील मानवता टिकविण्यास मदत होईल मला असे वाटते आता कार्यक्रम झाल्यानंतरच कार्यमालकाने जाताना प्रत्येकाला एक देशी वृक्षाचे रोपच द्यावे जेणेकरून ते रोप शेतात लावता येईल आणि यातूनच पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल असे वाटत असतानाच मनोज आवळेकर व सुरज आवळेकर यांनी आपल्या मुलाच्या बारशाला आलेल्या पाहुण्यांना प्रत्येकाला एक केशर आंब्याचे रोप भेट दिले यालाच म्हणतात खरे रिटर्न गिफ्ट खरोखरच आवळेकर कुंटूंबाचे कौतुक आणि असा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल खूप अभिनंदन हाच आदर्श आज प्रत्येकानी घ्यावा हिच माफक अपेक्षा.


प्रा.श्री.विनायक मनोहर कलुबर्मे

सदस्य वारी परिवार,मंगळवेढा.


test banner