कौतकस्पद! श्री संत दामाजी महाविद्यालयाची ही विद्यार्थिनी शास्त्र विभागात तालुका प्रथम. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २१ मे, २०२४

कौतकस्पद! श्री संत दामाजी महाविद्यालयाची ही विद्यार्थिनी शास्त्र विभागात तालुका प्रथम.


मंगळवेढा:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभाग पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये श्री संत दामाजी महाविद्यालयाची श्रद्धा राजेंद्र नागणे हिने ५५२ गुण मिळवून ९२ टक्के गुण प्राप्त करून शास्त्र विभागात श्री संत दामाजी महाविद्यालयात व मंगळवेढा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावित दामाजी महाविद्यालयाची तालुका प्रथम येण्याची परंपरा अखंडीत ठेवली.


शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन,उत्तम अभ्यासाचे नियोजन व परीक्षादेतेवेळी असणारा आत्मविश्वास यामुळेच सदरचे यश प्राप्त केले आहे यावेळी भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात उत्तम पद्धतीने काम करण्याची ईच्छा व्यक्त करत महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे ऋण व्यक्त केले.


यावेळी श्रद्धा नागणे हिने बोर्ड परीक्षेत सुयश संपादन केल्याबद्दल श्री विद्या विकास मंडळाचे पदाधिकारी,सभासद,प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य,प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,सर्व शिक्षक यांचेसह विविध क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले.





test banner