मंगळवेढा:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभाग पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये श्री संत दामाजी महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.
श्री संत दामाजी महाविद्यालयातील १२ वी शास्त्र शाखेचा शेकडा निकाल ९८.३७ वाणिज्य शाखेचा शेकडा निकाल ९८.६१ तर कला शाखेचा शेकडा निकाल ८९.७४ टक्के लागला असून मंगळवेढा तालुक्यात शास्त्र शाखेतून प्रथम क्रमांक श्रध्दा राजेंद्र नागणे (५५२ गुण) ९२.०० टक्के, द्वितीय क्रमांक सानिया सिंकदर मुजावर (५०६ गुण) ८४.३३ टक्के तर तृतीय क्रमांक प्रिती अरूण सासणे (५०३ गुण) ८३.८३ टक्के गुण मिळवले आहेत.
वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक नुतन नानासाहेब सुळकुंडे (५३३ गुण) ८८.८३ टक्के द्वितीय क्रमांक सोनाली लक्ष्मण यादव ( ४९२ गुण) ८२.०० टक्के तर तृतीय क्रमांक प्रणोती दत्तात्रय गायवाले ( ४८६ गुण) ८१.०० टक्के तर कला शाखेतून प्रथम क्रमांक शितल विकास चौगुले (४६९ गुण) ७८.१७ टक्के,द्वितीय क्रमांक निकीता राम बेंडे (४५८ गुण) ७६.३३ टक्के तर तृतीय क्रमांक वैष्णवी बाबासाहेब साठे (४०२ गुण) ६७.०० टक्के गुण मिळवून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची गुणवत्तेची पंरपंरा कायम ठेवलेली आहे.
यावेळी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ एन बी पवार म्हणाले सर्व शिक्षकांनी केलेले योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट हेच खरे यशाचे फलित आहे विद्यार्थ्यांनी कॅापीमुक्त वातावरणात दिलेल्या परीक्षेत मिळवलेले हे खरे गुण असुन निश्चितच महाविद्यालयाचा नावलौकिक वाढलेला आहे.
विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता संयमाने आपला शैक्षणिक आलेख उंच करून वाचन संस्कृती टिकविली पाहिजे असे सांगून सर्व गुणवंत व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री विद्या विकास मंडळाचे पदाधिकारी,सभासद,प्राचार्य डॉ एन बी पवार उपप्राचार्य,प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांचेसह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले कौतुक सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा सदाशिव कोकरे यांनी केले सूत्रसंचालन प्रा विनायक कलुबर्मे यांनी केले तर प्रा धनाजी गवळी यांनी आभार मानले.