प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी यांची निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १४ मार्च, २०२४

प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी यांची निवड.


मंगळवेढा:-

प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी डोनजचे राकेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.


यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के यांच्या हस्ते पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले.


याआधी राकेश पाटील यांनी प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या तालुका उपाध्यक्ष पदी काम करत असताना प्रत्येक कामातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.


पाटील यांनी दिव्यांग बांधव,शेतकरी,विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेऊन वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम पाटील यांनी केले आहे.


तसेच पक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विवीध कार्यक्रम,सामाजिक उपक्रम,आंदोलने या मध्ये पाटील यांचा सक्रिय सहभाग असतो.याआधी त्यांनी अनेक आंदोलने करत,आवाज उठवत राकेश पाटील यांनी सर्वसामान्यांच्या हिताची कामे केली आहेत.


राकेश पाटील हे आमदार बच्चू कडू यांचा विश्वासू सहकारी म्हणून तालुक्यात ओळख निर्माण केली आहे. राकेश पाटील हे प्रहार च्या डोणज शाखेपासुन सुरवात केली ते आज तालुकाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले आहेत.


राकेश पाटील यांनी गावातील तरुणांना एकत्र करून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी यशस्वी झाले आहेत. गावातील पिक विमा, दिव्यांग निधी, अतिवृष्टी, गावातील उत्सव यासाठी ते प्रयत्नशील असतात तसेच तालुक्यात अपंग, विधवा, निराधार, शेतकरी, विद्यार्थी,कामगार व मजूर यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम केले आहे.


तसेच राकेश पाटील यांनी गेल्या 6 वर्षात पक्षाचे ध्येय धोरण तालुक्यातील प्रत्येक गावात पोहचवले आहे. प्रहार जनशक्ती पक्ष वाढीसाठी ते प्रयत्न करत असतात त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांनी मंगळवेढा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी राकेश पाटील यांच्या कडे सोपवली आहे.


प्रहार चे मंगळवेढा तालुका अध्यक्ष राकेश पाटील बोलताना असे म्हणाले की प्रहार जनशक्ती पक्ष ह्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कामाची तसेच सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरण ही सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माझी नियुक्ती केलेली असून या अध्यक्षपदाचा मी सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या कल्याणासाठी उपयोग करणार आहे.


असे प्रहारचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष राकेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले आहे.सदर निवडीचे पत्र देताना प्रहार चे जिल्हा पदाधिकारी व सर्व मंगळवेढा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.


test banner