सहनशीलतेची मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात असा इशारा म्हणून जरांगे यांनी संवाद दौऱ्यामध्ये दिला. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ५ मार्च, २०२४

सहनशीलतेची मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात असा इशारा म्हणून जरांगे यांनी संवाद दौऱ्यामध्ये दिला.

 


टीम संवाद न्यूज :

मनोज जरांगे पाटील यांची संवाद यात्रा मोहोळ शहरात आली असताना त्यांनी समाज बांधवाना सांगितले कि सरकारने सगेसोयरेचा शब्द देऊन अधिसूचना काढली पण त्याचे कायद्यात रूपांतर केले नाही अशा प्रकारे सरकारने मराठा समाजाला लटकवत ठेवले आहे.

२०१८ साली मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण देण्यात आले होते. त्यावेळी त्या आरक्षण कोर्टात टिकले नाही आताही त्याप्रमाणेच मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण हे फसव आहे आणि ते कोर्टात टिकणार नाही.

आपली एकजूट आपण अशीच ठेवली कि सगेसोयरे आधिसुचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करायला सरकारला भाग पाडू.



पुढे बोलताना ते म्हणाले काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा कार्यक्रम करतोच मी असं विधान केलं होतं. या विधानाला उत्तर देताना मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात असा इशारा म्हणून जरांगे यांनी संवाद दौऱ्यामध्ये मराठा बांधवांना संबोधित करताना दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले मी कधीही समाजाशी गद्दारी करणार नाही आता तोंडाजवळ घास आला आहे आता तो सोडू नका असा आव्हान देखील मराठा बांधवांना त्यांनी केलं.

 

test banner