मंगळवेढा येथील माचनूर गावाची सिध्देश्वर यात्रा आजपासून सुरू.या या कार्यक्रमांचे उपक्रमांचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

मंगळवेढा येथील माचनूर गावाची सिध्देश्वर यात्रा आजपासून सुरू.या या कार्यक्रमांचे उपक्रमांचे आयोजन.


मंगळवेढा:-

मंगळवेढा तालुक्यातील प्रसिद्ध श्री.सिध्देश्वर देवस्थान श्रीक्षेत्र माचनूर  येथे महाशिवरात्री निमित्त आजच्या पासून यात्रा सुरू होत असून त्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.


त्यामध्ये शुक्रवार दि.८ मार्च रोजी पहाटे ४.०० वाजता श्रींची महापूजा तहसीलदार मदन जाधव तसेच प्रांत अधिकारी बी.आर माळी,उद्योजक संजय आवताडे यांच्या यांच्या हस्ते संपन्न झाली.


तसेच महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षी येथे महारष्ट्र सह अनेक राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.


आज सायंकाळी ७.०० वाजता श्रींच्या पालखीचे सवाद्य मिरवणुकीने गावाकडून मंदिराकडे प्रस्थान होणार आहे.तसेच नयनरम्य आतिषबाजी चे उद्घाटन सोमनाथ आवताडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे.


तर शनिवार दि.९ मार्च रोजी सायंकाळी ७ ते सकाळ पर्यंत पारंपरिक भेदिक कार्यक्रम(कलगी/तुरे) या कार्यक्रम रंगणार आहे.तसेच दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.या शा.जगन्नाथ डोके, शा.सुरेश तेली, शा. राजू वाघमारे, शा.जयवंत रणदिवे, शा.हिंदुवराव पाटील, शा.रघुनाथ निकम, शा.मेजर रागुनाथ पवार, शा. बन्सी कांबळे, शा.प्रल्हाद क्षीरसागर आदी.शाहीर आपली कला सादर करणार आहेत.


तसेच रविवार दि.१० मार्च रोजी अखिल भारतीय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.या स्पर्धेचे उद्घाटक आ.समाधान आवताडे हे असतील तर आ.प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली व आ.सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.


या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे बुलेट गाडी व मानाची गदा मिळणार असून इतर बक्षीसांमध्ये ५१०००/-,२१०००/-,११०००/- अशी रोख स्वरूपातील बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.


सोमवार दि.१२ मार्च रोजी शेवटच्या दिवशी श्रींच्या पालखीचे सिध्देश्वर मंदिरातून माचनुर गावाकडे प्रस्थान होणार आसून महाप्रसादाने यात्रेची सांगता होणार आहे.


तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमांचा व उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी कडून करण्यात आले आहे.


test banner