सावित्रीमाई समाजसुधारणेसाठी आपले आयुष्य वेचले. त्यांची आज पुण्यतिथी (१० मार्च, २०२४), यानिमित्ताने सावित्रीमाईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
‼️ सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान ‼️
◆ मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले.
◆ मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका.
◆ शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ. 'अभ्यासक्रम नियोजन' हा विषय आज शिक्षण शास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो.
◆ सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
◆ शिक्षणा मध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
◆ शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक. राज्य सरकारने 'आनंददायी शिक्षण' ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे.
◆ त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली 'नेटिव्ह लायब्ररी' काढली होती.
◆ त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केद्र 'नॉर्मल स्कूल' काढले व चालवले होते.
◆ त्यातून 'फातिमा शेख' ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रेय सुद्धा सावित्रीबाई व जोतिबा फुले यांना जाते.
◆ पुणे व आजूबाजूंच्या १८ शाळांचे संचालन करणाऱ्या पहिल्या संचालिका.
◆ विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणाऱ्या पहिल्या संचालिका.
◆ सह-शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ. त्यासाठी वेताळ-पेठेत सहशिक्षण देणारी शाळा काढली. पण विवाहित महिलांनी मुलांसोबत बसण्यास नकार दिल्याने मुलांची व मुलींची अशा दोन शाळा केल्या.
◆ शालेय विद्यार्थ्याना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना विद्यावेतन (स्कॉलरशिप) देणे सुरु करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
◆ गरीब घरांतील मुले शाळेत यावीत म्हणून त्यांना खायला देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका. सरकार अलीकडे हा उपक्रम राबवीत आहे.
◆ प्राथमिक स्तरापासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
◆ विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या समस्या याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक. विकसित देशांत शाळाशाळांत समुपदेशक असणे आवश्यक आहे.
◆ सरकार तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका.
◆ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घरी विनामूल्य वसतिगृह चालवणारे पहिले दाम्पत्य.
◆ विधवा स्त्रियांसाठी वसतिगृह काढणारे पहिले दाम्पत्य.
◆ फुले दाम्पत्त्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते. शेतकरी, कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा काढल्या होत्या.
◆ सावित्रीबाई व जोतीराव यांनी आपल्या शाळेत शिकलेल्या धुराजी आप्पाजी चांभार व रानबा महार यांना शिक्षक बनवले होते. याप्रकारे भारतात दलित व्यक्तीना सर्वप्रथम शिक्षक बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांना मिळतो.
◆ मारेकरी म्हणून आलेल्या धोंडीराम नामदेव कुंभार याला पहिला पंडित बनविण्याचा मान फुले दांपत्याकडे जातो.
◆ आधुनिक, वैज्ञानिक, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या.
◆ आधुनिक काव्याच्या जनक. (केशवसुतांच्या सुमारे ४० वर्षे आधी आधुनिक शैलीत व पंतकाव्य व संतकाव्य यापेक्षा वेगळ्या आणि जनसामन्यांच्या विविध विषयांवर कवितांचे लेखन). ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.
◆ खादीचा पुरस्कार व प्रसार करणाऱ्या पहिल्या सामाजिक नेता.
◆ अस्पृश्यांना स्वत:च्या घरची पाण्याची विहीर व हौद खुला करून देणारे पहिलेच दाम्पत्य.
◆ वाट चुकलेल्या विधवांच्या प्रसूतीसाठी व आधारासाठी 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरु करून चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. भारतातील हा असा पहिलाच प्रयोग होता.
◆ फुले दाम्पत्याने अनाथ व अवैध संतती म्हणून जन्माला आलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम काढले होते. हा भारतीयांचा अशा प्रकारचा पहिला अनाथाश्रम होता. त्यांच्या मातांसाठी सुद्धा वसतिगृह काढले होते.
◆ विधवा पुनर्विवाह सभेचे आयोजन व संघटन करणाऱ्या पहिल्या सुधारक.
◆ विधवा ब्राह्मण स्त्रीचा अनौरस मुलगा दत्तक घेतला. परक्या जातीतील मुलास दत्तक घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
◆ आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारी समाज सुधारक. स्वत:च्या दत्तक मुलाचा सुद्धा आंतरजातीय विवाह करून दिला होता.
◆ हुंडाविरहित सामुहिक विवाहाच्या प्रवर्तक.
◆ रोटीबंदीच्या काळात सर्व जातीय महिलांचे तीळ-गुळा सारखे मोठमोठे मेळावे घेणाऱ्या पहिल्या जाती निर्मूलक.
◆ मराठीतील पहिली पुस्तक संपादिका आणि प्रकाशिका. महात्मा फुले यांची भाषणे टिपणे काढून संपादित करून प्रकाशित केली.
◆ विधवांच्या केशवपन विरोधात न्हाव्यांचा यशस्वी संप घडवून आणला. हा भारतातील पहिला यशस्वी संप होता.
◆ सावित्रीबाई या प्रभावी वक्ता होत्या. सत्यशोधक समाजाच्या व इतर कार्यक्रमांत त्यांनी बरीच भाषणे दिली होती.
◆ पतीच्या अंत्ययात्रेत स्वत: टिटवे घेऊन जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
◆ पतीच्या चितेला अग्नी देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
◆ सत्याशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्ष.
◆ १८९६ साली दुष्काळात पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
◆ १८९६ साली दुष्काळात सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडून दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार हमी सारखी कामे सरकाराला सुरु करण्यास भाग पाडले.
◆ १८७६ च्या दुष्काळात उपासमार झेलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने ५२ अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता. १८९६ च्या दुष्काळातही अशी अन्नछत्रे चालविली.
◆ बहुजनांची चळवळ चालविणाऱ्या पहिल्या महिला पुढारी.
◆ भारतीय महिला मुक्ती व महिला सबलीकरण आंदोलनाच्या पहिल्या नेत्या.
#सावित्रीबाई_फुले.