कौतुकास्पद! खिदमत चॅरिटेबल बहुउद्देशीय संस्थेकडून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

कौतुकास्पद! खिदमत चॅरिटेबल बहुउद्देशीय संस्थेकडून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन.


मंगळवेढा:-

मंगळवेढा शहरात सामाजिक कार्यात अग्रगण्य असणारी व अनेक सामाजिक उपक्रम राबवून मंगळवेढा शहरात नावलौकिक मिळवणारी खिदमत चॅरिटेबल बहुउद्देशीय संस्था.


या संस्थेने 2019 पासून आनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.त्यामध्ये रक्तदान शिबिर,सामुदायिक विवाह सोहळा तसेच देशासाठी स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्मा यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे. 


या संस्थेच्या मध्यातून अनेक गोरगरिबांचे संसार उभे केले गेला आहेत. तसेच खिदमत चॅरिटेबल गेली ५ वर्षे अखंड फ्री खतना कॅम्पचे नियोजन करत आली आहे.


तसेच या संस्थेमार्फत आज दि.२५ फेब्रुवारी २०२४ रॉयल फंक्शन हॉल येथे फ्री खतना कॅम्प चे नियोजन करण्यात आले होते.या मध्ये १३६ बालकांचे खतना यशस्वी पणे करण्यात आली.


या खतना कॅम्पसाठी मा.अजित जगताप, मा.आझाद पटेल(दारूवाले),मा.पांडुरंग नाईकवाडी(कोळी),चांद मुजावर(बोराळे),मुस्लिम जमियत चेअरमन फिरोज मुलाणी व आदी मान्यवरांनी कार्यक्रमासाठी सप्रेम सहकार्य केले.


त्याबद्दल खिदमत चारिटेबल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.नजीर भाई इनामदार यांनी आभार मानले.


कार्यक्रम पार पाडण्यासाठी खिदमत बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


test banner