मंगळवेढा:-
सार्वजनिक शिवजयंती जयंती उत्सव मंडळ,मंगळवेढा यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.
आज १६ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम पुष्प ५ वे महराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज सायाळकर ता.पालम जि. परभणी यांचे कीर्तन सायंकाळी ७.३० वाजता संपन्न होणार आहे.
समाज प्रबोधन कीर्तन विविध प्रकारचे संदेश या कीर्तन मधून देण्यात येणार आहेत.
तरी सर्व महिला भगिनी,सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांनी केले आहे.