मंगळवेढा:-
मारापूर गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त १ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.
त्यामध्ये १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता भगवान अण्णा आसबे तंटामुक्त अध्यक्ष यांच्या शुभहस्ते शालेय साहित्य व खाऊ वाटप होणार आहे.
तसेच सकाळी १० वाजता शरदचंद्र कृषी विद्यालय मारापूर येथे सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिर संपन्न होणार आहे.आवताडे शुगर्स चे चेअरमन संजय आवताडे यांच्या हस्ते या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
त्यांनतर सकाळी १०.३० वाजता मूकबधिर शाळा,मंगळवेढा व मुक्ताई मतिमंद मुलांचे बालगृह लवंगी येथे मोफत अन्नदान करण्यात येणार आहे.
शरदचंद्र कृषी विद्यालय या शाळेच्या भव्य पटांगणामध्ये सरपंच चषक २०२४भव्य हाफ पिच क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले गेले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते या सरपंच चाशकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
तरी ग्रामस्थांनी,कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सायोजनकंच्या वतीने करण्यात आले आहे.